corona chain
corona chain 
जळगाव

पंधरा दिवसांनंतर कोरोना’चे चित्र स्पष्ट होणार 

देविदास वाणी

जळगाव : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण येण्याच्या संख्येत गेल्या दोन-तीन दिवसांपासून घट होत आहे. सोबतच रुग्ण मृत्यूचा दरही कमी होत आहे. हे असे सकारात्मक चित्र किमान ८ ते १५ दिवस राहिल्यास निश्चितच कोरोना संसर्गापासून दिलासा मिळतानाचे चित्र असेल. मात्र, सध्या कोरोना चाचण्यांची संख्या कमी होत असल्याने कोरोना रुग्ण कमी येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. सी. चव्हाण यांनी ‘सकाळ’ ला दिली. 

पूर्वी कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कॅम्प लावण्यात आले होते. त्याद्वारे अधिक तपासण्या होऊन संशयित रुग्ण अधिक संख्येने येत होते. त्यांनी कोरोना टेस्ट केली जात होती. लक्षणानुसार टेस्ट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येत होती. नंतर सर्दी, खोकला, ताप येणे, श्‍वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसताच लवकर दाखल होऊन उपचार घेतले, तर रुग्ण बरे होतात अशी जनजागृती करण्यात आली. यामुळे अनेकांनी स्वतःहून लक्षणे जाणवताच तपासणी केली. ज्यांचे वय ५५ च्या पुढे होते, त्यांना अगोदरच विविध आजार होते आणि ते लवकर आले नाहीत, तर त्यांच्या प्रतिकार क्षमतेनुसार त्यांनी कोरोनाचा सामना केला आणि ते बरे झाले. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी होती, व्याधी आधीपासूनच होत्या आणि ते उशिराने दाखल झाले, त्यांच्यावर उपचार करूनही त्यांना वाचविता आले नाही. 

मोहिमेतंर्गत लागलीच उपचार
आता मात्र सर्वांनाच कोरोनाची जाणीव झाली आहे. त्याचा सामना करण्यासाठी नागरिक पुरेशी काळजी घेत आहेत. दुसरीकडे आपण सध्या कोरोना चाचण्या कमी केल्या आहे. कारण ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम सूरू आहे. या मोहिमेत रुग्णांची तपासणी करून त्यांना लागलीच उपचारासाठी पाचारण केले जात आहे. 

म्‍हणूनच होतेय प्रमाण कमी
सध्या २५०० कोरोना चाचण्या रोज केल्या जात आहेत. त्यात १५०० ॲन्टीजन, तर १ हजार जणांचे स्वॅब घेतले जात आहे. पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी, तातडीचे उपचार मिळत असल्याने मृत्यूदराचे प्रमाण कमी असे सध्याचे चित्र आहे. हे चित्र असेच ८ ते १५ दिवस राहिल्यास आपण कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात काहीअंशी यशस्वी ठरल्याचे सांगता येईल, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरू - गुजरात येणार आमने-सामने; स्पर्धेतील आव्हान टिकवण्याचं दोन्ही संघांसमोर आव्हान

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT