corona update 
जळगाव

कोरोना हळूहळू वाढतोय; मृत्‍यूही थांबेना

राजेश सोनवणे

जळगाव : जिल्‍ह्‍यातील कोरोनाची स्‍थिती पुन्हा एकदा चिंताजनक होत चालली आहे. नवीन कोरोना बाधितांचा आकडा सध्या कमी दिसत असला तरी जिल्‍ह्‍यात कोरोना हळूहळू वाढण्यास सुरवात झाली आहे. शिवाय, कोरोनामुळे होणारे मृत्‍यू देखील अद्याप थांबलेले नाही.
जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आजही बरे होणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या पुन्हा जास्त आढळून आली आहे. जिल्ह्यात आज ७४ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर ४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकुण बाधितांची संख्या ५४ हजार ४५७ पर्यंत पोहचली असून ५२ हजार ५९९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एका रुग्णाचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १ हजार २९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. तर ५६५ रुग्ण सध्या उपचार घेताय.

जळगाव, भुसावळ चिंताजनक
जिल्‍ह्‍यातील कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा एकदा वाढत असून, यात जळगाव आणि भुसावळची स्‍थिती अधिक चिंताजनक आहे. कारण जिल्‍ह्‍यात आढळून येत असलेल्‍या एकूण कोरोना बाधितांमध्ये जळगाव आणि भुसावळमध्ये सर्वाधिक रूग्‍ण आढळून येत आहेत. आज देखील जळगाव शहरात १७ आणि भुसावळमध्ये १४ नवीन रूग्‍ण आढळून आले आहेत.

असे आढळले रूग्‍ण
जळगाव शहर १७, जळगाव ग्रामीण ०२, भुसावळ १४, अमळनेर ०८, पाचोरा ०१, भडगाव ०३, यावल ०७, जामनेर ०३, रावेर ०५, पारोळा ०२, चाळीसगाव ०८, मुक्ताईनगर ०१, इतर जिल्ह्यातील ०३ असे एकुण ७४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. तर चोपडा, धरणगाव, एरंडोल आणि बोदवड तालुक्‍यात एक देखील रूग्‍ण आढळून आला नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची दांडी, IIM जम्मूने ५०० रुपये दंडाची पाठवली नोटीस

Coastal Road Accident: BMW फ्लायओव्हरवरून खाली कशी कोसळली? धक्कादायक घटनेचा CCTV व्हायरल

UPI Transaction Fee : ऑनलाइन व्यवहारांना लागणार ब्रेक? केंद्र सरकारच्या निर्णयामुळं शेतकऱ्यांना बसणार लाखो रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड, UPI शुल्क बदलामुळं वाढली चिंता

SMRITI MANDHANA: सुजी बेट्सला मागे टाकलं अन् स्मृती मंधानाने रचला इतिहास! महिला T20I मध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली

Vastu Benefits of Shankh: घरात शंख ठेवण्याचे 'हे' आहेत फायदे; वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या शंखाचा योग्य प्रकार अन् दिशा!

SCROLL FOR NEXT