Jalgaon corona update Jalgaon corona update
जळगाव

नव्या रुग्णांची संख्या पन्नासच्या घरात

नव्या रुग्णांची संख्या पन्नासच्या घरात

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग (Jalgaon corona update) नियंत्रणात येत असताना, नव्या रुग्णांची संख्या आता पन्नासच्या टप्प्यात आली आहे. शुक्रवारी (ता. १८) नवे ५३ रुग्ण आढळून आले, तर १२९ रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus) मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला. (jalgaon-coronavirus-update-positive-patient-only-fifty)

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असून, कोरोनामुक्तीसाठी अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे. शुक्रवारी प्राप्त चार हजार चाचण्यांच्या अहवालात ५३ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक लाख ४१ हजार ८३८ झाली आहे, तर १२९ रुग्ण बरे झाले. बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३७ हजार ७६५ वर पोचला आहे. रिकव्हरी रेट ९७.१३ टक्के झाला आहे. जळगाव तालुक्यातील ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद असून, बळींचा आकडा दोन हजार ५६७ झाला आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर सात, जळगाव ग्रामीण पाच, अमळनेर दोन, चोपडा तीन, पाचोरा दोन, भडगाव एक, धरणगाव सहा, यावल एक, एरंडोल दोन, जामनेर तीन, रावेर दोन, पारोळा तीन, चाळीसगाव १४, मुक्ताईनगर एक, बोदवड एक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT