coronavirus update 
जळगाव

सात तालुक्‍यात शुन्य तर अमळनेरमध्ये सर्वाधिक बाधित

राजेश सोनवणे

जळगाव : जिल्‍ह्‍यातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव निश्‍चितच कमी झाल्‍याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. मागील दोन महिन्यांपासून बाधितांची संख्या कमी झाली असून आज जिल्‍ह्‍यात केवळ ३४ नवीन रूग्‍ण आढळून आले. यातील अमळनेर तालुक्‍यात सर्वाधिक बारा रूग्‍णांचा समावेश आहे.
जिल्‍ह्‍यातील कोरोना व्हायरस कमी झाल्‍याचे चित्र पाहण्यास मिळत असले तरी देखील गाफील राहून चालणार नाही. गर्दीच्या ठिकाणी तोंडाला मास्‍क लावून राहणे हिच आपली सुरक्षा ठरणार आहे. जिल्‍ह्‍यातील कोरोना बाधितांच्या संख्येला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. दिवाळीनंतर संख्या वाढणार असे बोलले जात होते. मात्र त्‍या तुलनेत जिल्‍ह्‍यातील बाधितांची रोजची संख्या ही शंभरच्या आत येत आहे. यामुळे जिल्‍ह्‍यासाठी हे दिलासादायक चित्र म्‍हणावे लागणार आहे. 

४२७ ॲक्‍टीव्ह रूग्‍ण
जिल्‍ह्‍यात आज दिवसभरात एकूण ३४ जणांना बाधा झाल्‍याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. यामुळे एकूण बाधितांची संख्या ५४ हजार ८७२ वर पोहचली आहे. तर दुसरीकडे ५७ रूग्‍ण बरे होवून घरी परतले असून आतापर्यंत बरे झाल्‍यांची संख्या ५३ हजार १३९ वर पोहचली आहे. तरी देखील सद्यस्‍थितीला जिल्‍ह्‍यात ४२७ ॲक्‍टिव्ह रूग्‍ण असून १४६ जणांना लक्षण आहेत; तर २८१ रूग्‍णांमध्ये लक्षण नाही. तसेच आजच्या एका मृत्‍यूमुळे जिल्‍ह्यात १ हजार ३०१ मृत्‍यू कोरोनामुळे झाले आहे. 

असे आढळले रूग्‍ण
जळगाव शहर ३, भुसावळ ४, अमळनेर १२, पाचोरा १, धरणगाव १, यावल १, जामनेर १, रावेर ५, चाळीसगाव ५ आणि इतर जिल्‍ह्‍यातील एक रूग्‍णाचा समावेश आहे. तर उर्वरीत तालुक्‍यांमध्ये एक देखील रूग्‍ण आढळून आला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT