coronavirus update 
जळगाव

Corona update कोरोना ३१३...मृतांचा आकडा सहाशेपार

राजेश सोनवणे

जळगाव : जिल्‍ह्‍यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतच चालला आहे. सलग चौथ्‍या दिवशी देखील कोरोनाचे तिनशेहून अधिक रूग्‍ण आढळून आले असून, आजच्या नवीन ३१३ रूग्‍णांची भर पडल्‍याने जिल्‍ह्‍यातील आकडा चौदा हजाराच्या उंबरठ्यावर येवून पोहचला आहे. तर कोरोनामुळे मृत्‍यू झालेल्‍यांची संख्या देखील सहाशेवर पोहचली आहे.
जिल्‍ह्‍यातील कोरोनाचा संसर्ग फोफावत चालला आहे. चार महिन्यांपुर्वी आढळून आलेल्‍या एका रूग्‍णानंतर आजच्या स्‍थितीला अधिक भयावह स्‍थिती झाली आहे. लॉकडाउननंतर मार्केट खुले झाल्‍याने संसर्ग अधिक वाढण्याची भिती वर्तविली जात होती. तीच परिस्‍थिती पाहण्यास मिळत असून, दररोज तिनशेपेक्षा अधिक रूग्‍ण आढळून येत आहे. यामुळे आरोग्‍य यंत्रणेसह जिल्‍हा प्रशासनाची चिंता वाढत चालली आहे. अवघ्‍या दोन- तीन दिवसात एक हजार रूग्‍णांना पल्‍ला पुर्ण होत असून चौदा हजाराचा आकडा लवकरच पार होणार आहे.

२४४ झाले कोरोनामुक्‍त
जिल्ह्यात आज नव्याने ३१३ कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या १३ हजार ८८७ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे दिवसभरात २४४ कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. यामुळे जिल्‍ह्‍यातील बरे होणाऱ्या रूग्‍णांची संख्या आता 

मृतांचा आकडा सहाशेपार
कोरोनाची लागण झालेल्‍या रूग्‍णांवर कोविड रूग्‍णालयात उपचार सुरू आहेत. परंतु अधिक त्रास झाल्‍याने यामुळे मृत्‍यू देखील होत आहे. आज दिवसभरात कोरोनामुळे नऊ जणांचा मृत्‍यू झाला. यामुळे जिल्‍ह्‍यातील एकूण मृतांची संख्या ही सहाशे पार झाली आहे. आज मृत्‍यू झालेल्‍यांमध्ये चोपडा, भुसावळ तालुक्यातील प्रत्येकी २, जळगाव तालुका, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव आणि पाचोरा तालुक्यातील प्रत्येकी एका बाधीत रुग्णांचा समावेश असल्‍याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

असे आढळले रूग्‍ण
जिल्‍ह्‍यात नव्याने ३१३ कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर ६८, जळगाव ग्रामीण १२, भुसावळ १४, अमळनेर ५३, चोपडा २६, पाचोरा ३, भडगाव २६, धरणगाव १२, यावल १४, जामनेर २६, रावेर २१, पारोळा १६, चाळीसगाव ४, मुक्ताईनगर १२, बोदवड १ इतर जिल्ह्यातील ५ अशी रूग्ण संख्या आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert Today : पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' 11 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा Yellow Alert जारी

Anjangaon: खेलोबा देवस्थानाची जागा असल्याचे मान्य! शिवरायांच्या पुतळ्याबाबत अखेर तोडगा; राजन पाटलांची मध्यस्थी, एका रात्रीत काय घडलं?

Sangli Sambhaji Maharaj Statue : सांगलीत रात्रीतून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तात्काळ कारवाई

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

Spicy Thecha Paneer Wrap: वीकेंड नाश्त्यासाठी बनवा झणझणीत थेचा-पनीर रॅप; फक्त २० मिनिटांत तयार होणारा हेल्दी ऑप्शन!

SCROLL FOR NEXT