coronavirus update 
जळगाव

जळगाव जिल्‍ह्‍यात नवीन ४८ रूग्‍णांची वाढ; ४९ झाले बरे

राजेश सोनवणे

जळगाव : जिल्‍ह्‍यातील कोरोना संसर्ग पुर्णपणे गेलेला नाही. दिवसभरातून बाधितांची संख्या वाढतीच आहे. तुलनेत संख्या कमी असली तरी आतापर्यंत सात- आठ तालुक्‍यात एक देखील रूग्‍ण आढळून येत असताना केवळ पाच तालुक्‍यात शुन्य रूग्‍ण आढळून आले. तर दुसरीकडे जळगाव शहर आणि मुक्‍ताईनगर तालुक्‍यात सर्वाधित रूग्‍ण आढळून आले.

कोरोना संसर्गाचा जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज दिवसभरात ४८ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजच्या वाढलेल्‍या रूग्‍णांमुळ जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ५५ हजार ५५ पर्यंत पोहचली आहे. तर ५३ हजार ३३७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. 

मृत्‍यूचा आकडा चिंतेचा
कोरोनामुळे मृत्‍यू होण्याचे अद्याप देखील थांबलेले नाही. रोज एक तरी रूग्‍णाचा कोरोनामुळे मृत्‍यू होत आहे. यात आज देखील एका रुग्णाचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १ हजार ३१३ रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्‍याची नेांद आहे. तर कोरोनाची लागण झालेल्‍यांमध्ये सद्यस्‍थितीला ४०५ रुग्ण उपचार घेत आहेत.
 
असे आढळले रूग्‍ण
जळगाव शहर ११, जळगाव ग्रामीण १, भुसावळ ८, पाचोरा ०१, यावल ०३, जामनेर ०४, रावेर ०२, पारोळा ०१, चाळीसगाव ०४, मुक्ताईनगर ११, बोदवड ०१, इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ४८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. तर अमळनेर, चोपडा, भडगाव, धरणगाव, एरंडोल या चार तालुक्‍यात एक देखील रूग्‍ण आढळून आला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT