जळगाव

कोरोनामूळे महामार्ग चौपदरीकरणाला सहा महिन्यांची प्रतीक्षा

सुमारे सात किलोमीटरच्या टप्प्यात शहरातील जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण होणार होते

देविदास वाणी



जळगाव : शहरातील महामार्ग (Highway) चौपदरीकरणाच्या कामाला आता ‘ब्रेक’ लागला आहे. कोरोनोच्या दुसऱ्या लाटेत ( Corono second wave ) अनेक मजूर (Labor) लॉकडाउन (lockdown) होईल म्हणून आपापल्या गावी गेले आहेत. ते अद्याप परतले नसल्याने शहरातील चौपदरीकरण पूर्ण होण्यास आणखी सहा महिने लागणार आहेत.

(corono effect jalgaon city highway work was delayed)


नोव्हेंबरमध्ये कंत्राटदाराने सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचा ध्यास घेतला होता. मात्र, अजूनही शहरातील महामार्गाची अनेक ठिकाणची कामे अपूर्ण आहेत. खोटेनगर ते कालिंकामाता चौकापर्यंतच्या सुमारे सात किलोमीटरच्या टप्प्यात शहरातील जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण होणार होते. त्याअंतर्गत गुजराल पेट्रोलपंप, दादावाडी, प्रभात चौक व अग्रवाल हॉस्पिटल चौक, दादावाडी परिसरात भुयारी मार्ग (अंडरपास वे) होणार होते. त्यापैकी गुजराल पेट्रोलपंप व प्रभात चौकात, दादावाडी समोर अंडरपास तयार झाले आहेत. अग्रवाल हॉस्पिटल चौकात अंडरपासचे काम नुकतेच सुरू झाले आहे. इतर ठिकाणच्या अंडरपासला जोडण्यासाठी भराव टाकण्याची कामे अपूर्ण आहेत. ही कामे करताना वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.

पिंप्राळा पुलाचे कामही बाकी

या टप्प्यात ज्या चार ठिकाणी भुयारी मार्ग निश्‍चित करण्यात आले आहेत, त्या सर्व ठिकाणच्या चौकांचे काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. ते काम अद्यापही बाकी आहे. पिंप्राळा रेल्वे पुलाजवळ कोणतेही काम सुरू झालेले नाही. ते आता पावसाळ्यात सुरू होईल.

रोटरी जंक्शन, सर्कलला सुरवातच नाही

वर्दळीच्या आकाशवाणी चौकात ‘रोटरी जंक्‍शन’ तर इच्छादेवी व अजिंठा चौफुलीवर सर्कल नियोजित आहे. या कामांना अद्यापही सुरवात नाही. मार्च २०२१ पर्यंत या कामांना मुदतवाढ होती. ती मुदतवाढही आता निघून गेली आहे. दादावाडीजवळील भरावाच्या कामाला आतापासूनच तडे पडले आहेत. यावरून कामाचा दर्जा लक्षात येत आहे. अतिशय संथ गतीने सुरू असलेल्या या कामांकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देवून लवकरात लवकर काम पूर्ण करण्यची अपेक्षा व्यक्त होत आहे.


देखभाल पाच वर्षे ‘न्हाई’कडे

या सहा-सात किलोमीटरच्या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ६९ कोटींची निविदा मंजूर असून, जांडू कन्स्ट्रक्‍शन ॲन्ड इन्फ्रा या मक्तेदारास काम सोपविण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावरून कोणताही टोल आकारला जाणार नाही. या रस्त्याची देखभाल दुरुस्ती पाच वर्षांसाठी महामार्ग प्राधिकरणाकडे राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT