जळगाव

गोलाणीत मनपाची अचानक कारवाई...पाच लाख रुपयांचे मोबाईल, साहित्य जप्त

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः जळगाव शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने परिस्थीती चितांजणक बनत चालली आहे. त्यात बाजार, मार्केट परिसरात नागरिकांची प्रंचड होणारी गर्दी कारणीभूत ठरत आहे. त्यानुषंगाने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे शहरात फळ-भाजीपाला, मार्केट परिसरातील बंदी असलेल्या दुकानांवर तसेच हॉकर्सवर कारवाई केली जात आहे. त्यात आज गोलाणी मार्केटमध्ये सकाळी अकरा वाजता दुकानांबाहेर मोबाईल विक्रेते मोबाईल व मोबाईल साहित्य विक्री करणाऱ्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करण्यात आली. कारवाईत पाच लाखाचे मोबाईल व मोबाईल साहित्य जप्त करण्यात आले. 

जळगाव शहरात "कोरोना'चा संसर्ग वाढत असून रुग्णसंख्या दररोज मोठ्या संख्येने वाढत आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग तसेच महापालिका प्रशासनाकडून शहरात कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी युध्दपातळीवर काम करत आहे. परंतू शहरातील अनेक भागात भरणारे फळ-भाजी बाजार, किराणा अन्य साहित्य घेण्यासाठी गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शहरात कोरोना बाधितांची संख्या 4 हजाराच्या वरती झाली आहे. त्यानुषंगाने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोलाणी मार्केट मध्ये दुकानांच्या बाहेर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली. अचानक झालेल्या कारवाईमूळे मोबाईल विक्रेत्यामध्ये चांगलाच गोंधळ उडाला तर काही वेळासाठी धावपळ देखील झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. 

पाच लाखाचे मोबाईल, साहित्य जप्त 
गोलाणी मार्केट हे मोबाईल मार्केट म्हणून ओळखले जात असून लॉकडाऊनमूळे गेल्या चार महिन्यास पासून शहरातील मार्केट बंद आहे. फुले मार्केट परिसरात अश्‍याच प्रकारे गर्दी होत असल्याने महापालिकेने मार्केटचे सर्व प्रवेशद्वार बंद करून मार्केटमधील केवळ जिवनाश्‍यक वस्तूचे दुकानांनाच उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार गोलाणी मार्केट मध्ये देखील गेल्या महिन्याभरापासून दुकानांच्या बाहेर नविन मोबाईल, मोबाईल साहित्य तसेच मोबाईल दुरूस्ती मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने आज शहरातील गोलाणी मार्केट मधे पंधरा विक्रेत्यांकडून सुमारे पाच लाखाचे मोबाईल व मोबाईल साहित्य कारवाईत जप्त केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT