covid test home to home
covid test home to home 
जळगाव

जळगावात आता घरोघरी होणार तपासणी; मनपाकडून १५१ पथके

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात लवकरच 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम हाती घेण्यात येत आहे. शहरात घरोघरी जाऊन १५१ पथकांद्वारे नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर राज्यात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम राबविण्याचे निर्देश शासनाकडून जारी झाले आहेत. जळगाव शहरात मोहिमेच्या अंमलबजावणी आणि नियोजनासाठी महापौर सोनवणे यांनी सोमवारी दुपारी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेतली. यावेळी स्थायी समिती सभापती ॲड. शुचिता हाडा, महिला व बालकल्याण सभापती शोभा बारी, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसेवक कैलास सोनवणे, भाजप गटनेते भगत बालाणी, सभागृह नेते ललित कोल्हे, शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नितीन लढ्ढा, एमआयएमचे गटनेते रियाज बागवान, नगरसेवक विशाल त्रिपाठी, नवनाथ दारकुंडे, अतुल बारी आदी उपस्थित होते. 

प्रत्येक घराला भेट 
या मोहिमेत शहरातील प्रत्येक घराला भेट देऊन कुटुंबातील प्रत्येकाची तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे. कोरोनाचा फैलाव होणार नाही, यासाठी ही मोहीम १०० टक्के यशस्वी करणे आवश्यक असून त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे. मोहिमेसाठी शहरातील नगरसेवक, मान्यवर आणि, विविध सामाजिक संस्थांची मदत घेऊन नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याची जनजागृती करावी, असे महापौरांनी यावेळी सांगितले. 

आरटीपीसीआर चाचणी करावी 
शहरात मोहिमेसाठी १५१ पथके तयार करण्यात येणार आहेत. पथकाकडून तपासणी केली जात असताना एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्याची आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी, जेणेकरून कोरोनाचे अचूक निदान होईल. एखाद्या व्यक्तीची चाचणी केल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल न करता गृह विलगीकरणात ठेवण्याची मुभा द्यावी. मोहिमेच्या पार्श्वभूमीवर अँटीजन टेस्ट किट देखील मागविण्यात आल्या आहेत. मनपा प्रशासनाकडून चोख नियोजन सुरू असून मोहिमेचे दोन्ही टप्पे यशस्वी करण्यात येतील, असे मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. 

नागरिकांचे दुर्लक्ष नको 
जळगावकरांच्या मनात कोरोनाची भीती कमी होत असली, तरी याकडे दुर्लक्ष करू नये. शहरात अजूनही अंदाजे १५% लोक मास्कचा वापर व सुरक्षित नियमांचे देखील पालन करत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोनाबाबत होत असलेला हलगर्जीपणा फार घातक असून, नागरिकांनी स्वतःची आणि परिवाराची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत बैठकीत उपस्थितांनी व्यक्त केले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 Final Video: अय्यरची विनिंग रन अन् KRR चं गंभीरसह तिसऱ्या ट्रॉफीसाठी जोरदार सेलिब्रेशन, रसेललाही अश्रु अनावर

Kavya Maran KKR vs SRH : हैदराबादच्या मालकीणबाईंच्या डोळ्यात अश्रू तरी दाखवला दिलदारपणा; पाहा VIDEO

Delhi Fire News : विनापरवाना सुरु होतं दिल्लीतलं बेबी केअर हॉस्पिटल; चौकशीत आढळले अनेक गैरप्रकार

Shreyas Iyer : KKR च्या विजयाचं श्रेय श्रेयसचं की गौतमचं? चंद्रकांत पंडितांना विसरून कसं चालेल?

Heatwave : अबब! उन्हाचा पारा ५१ अंशांवर; पुढचे तीन ते चार दिवस रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT