corona patient suicide 
जळगाव

Breaking कोरोना संशयीत रूग्‍णाची वॉर्डातच आत्‍महत्‍या; मृतदेह पाहून अन्य रूग्‍ण भयभीत

सकाळवृत्तसेवा

जळगाव : कोरोना व्हायरसची भिती प्रत्‍येकाच्या मनात आहे. अशात कोरोनाची लागण झालेल्‍या रूग्‍णांमध्ये तर जास्‍तच भितीचे वातावरण आहे. अशात भितीपोटी रूग्‍ण टोकाची भुमिका घेत असतात. असाच प्रकार जिल्‍हा कोविड रूग्‍णालयात घडला असून कोरोना संशयीत असलेल्‍या एका रूग्‍णाने गळफास घेवून आत्‍महत्‍या केल्‍याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

कोविड रूग्‍णालय अर्थात शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातल्‍या जिल्‍हा कोविड रूग्‍णालयातील वॉर्ड क्रमांक सहामध्ये दाखल कोरोना संशयीत रूग्‍णाने गळफास घेवून आत्‍महत्‍या केली. या रूग्‍णाने मध्यरात्रीनंतर गळफास घेत जीवनयात्रा संपविल्‍याचे बोलले जात आहे. रूग्‍णालयातील वॉर्ड क्रमांका सहामध्ये हा प्रकार घडला. सदर बाब वार्डात उपस्‍थित कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्‍याने त्‍यांनी याची माहिती पोलिसांना दिली. 

पोलिसांकडून तपास सुरू
जिल्‍हा रूग्‍णालयातील स्‍वच्छतागृहात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या विषय बरेच दिवस गाजला होता. यानंतर कोरोना संशयीत रूग्‍णांच्या वॉर्डात रूग्‍णाने आत्‍महत्‍या केल्‍याने खळबळ उडाली आहे. वॉर्डात छताला लटकणारा मृतदेह पाहून अन्य रूग्‍णांमध्ये धावपळ उडाली. त्‍यांनी बाहेर असलेल्‍या कर्मचाऱ्यांना सदर प्रकार सांगितल्‍यानंतर पोलिसांना बोलाविण्यात आले. रूग्‍णाने आत्‍महत्‍या कोणत्‍या कारणाने केली याचे कारण स्‍पष्‍ट झाले नसून पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प युद्ध संपवण्यासाठी आतुर ! अमेरिकेने इराणला पाठवला १५ कलमी शांतता प्रस्ताव, काय आहेत अटी ?

Chhatrapati Sambhajinagar: हॉटेल सहा हजार, सिलिंडर बाराशेच! हिशेब जुळेना ; पथके करतात तरी काय?

Ashok Kharat Case Update : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, प्रशासनात खळबळ !

Chhatrapati Sambhajinagar:अयोध्येच्या मंदिराची प्रतिकृती शहरात; धार्मिक वातावरणाची निर्मिती

Chhatrapati Sambhajinagar: संलग्नीकरणाची शुल्कवाढ स्थगित; चार सदस्यीय समिती स्थापन, पुढील बैठकीत होणार निर्णय

SCROLL FOR NEXT