जळगाव

डाळ उद्योगाला जाणवतोय कामगारांचा तुटवडा 

सकाळवृत्तसेवा

जळगाव  : जिल्ह्यात प्रमुख व महत्त्वाच्या असलेल्या डाळ उद्योगाची चाके रुळावर येत असली, तरी 
कामगारांअभावी हे उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. सध्या डाळ प्रक्रियेचे जे उद्योग सुरू आहेत, त्या ठिकाणी 35 ते 40 टक्केच कामगार हजर असून, त्याचा उत्पादनावर परिणाम होत आहे. डाळींना बाजारपेठेतून मागणी असली तरी उत्पादन पुरेसे नाही, आणि वाहतुकीचाही प्रश्‍न असल्याने माल संबंधित ठिकाणी पोहोचविण्यातही अडचणी येत आहेत. 

"कोरोना' संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर 24 मार्चपासून देशव्यापी लॉकडाउन जारी करण्यात आले. चार टप्प्यांतील "लॉकडाउन'नंतर एक जूनपासून त्यात बऱ्यापैकी शिथिलता देण्यात आली. असे असले तरी "लॉकडाउन'च्या काळातही जीवनाश्‍यक वस्तूंचे उत्पादन म्हणून जळगाव एमआयडीसीतील डाळ उद्योग सुरूच होते. "लॉकडाउन'मुळे जे बंद पडले होते, ते युनिट तसेच "लॉकडाउन'च्या दुसऱ्या टप्प्यापासून एमआयडीसीतील बहुतांश उद्योग सुरू होऊ लागले. 

कामगारांचा तुटवडा 
सध्या डाळ उद्योगातील शंभरापैकी जवळपास 50 ते 60 युनिट सुरू झाले आहेत. मात्र, हे सर्व युनिट अपुऱ्या क्षमतेने सुरू आहेत. उद्योगातील बहुतांश परप्रांतीय कामगार त्यांच्या गावी निघून गेल्याने उपलब्ध असलेल्या स्थानिक कामगारांद्वारेच काम करून घेतले जात आहे. जवळपास 40 टक्के कामगार उपलब्ध असून त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. कंपनीतील स्टाफही "कोरोना'च्या भीतीने पूर्ण संख्येने येत नसल्याचे चित्र आहे. बाजारपेठेत डाळींची मागणी चांगली आहे, त्या प्रमाणात पुरवठा करणे उत्पादन कमी होत असल्याने शक्‍य होत नाही, अशी उद्योजकांची व्यथा आहे. 

वाहतुकीचीही समस्या 
"लॉकडाउन'चा इफेक्‍ट वाहतुकीवरही झालेला आहे. अद्यापही आवश्‍यक व मागणीनुसार ट्रक उपलब्ध होत नाही. त्यामुळे संबंधित ठिकाणी माल पोहोचविणे कठीण झाले आहे. पुणे, मुंबई "कोरोना'चे "हॉटस्पॉट' असल्याने ट्रकचालक त्याठिकाणी जायला तयार नाहीत. त्यामुळे माल वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे. 

डाळ उद्योगाला "लॉकडाउन'चा मोठा फटका बसला असून, उद्योग सुरू असले तरी ते पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. कामगारांची उपस्थिती अवघी 40 टक्के आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. आणखी दोन-तीन महिने ही स्थिती राहील, असे दिसते. 
- प्रेम कोगटा (अध्यक्ष, डाळमिल ओनर्स असोसिएशन) 

उद्योग तर सुरू आहे. मात्र, आमच्याकडे कामगार पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. 30-35 टक्के कामगारांवर कंपन्या सुरू आहेत. मागणी जास्त असली तरी कामगार नसल्याने पुरवठा त्याप्रमाणात करणे शक्‍य होत नाही. 
- निखिल ठक्कर (संचालक, गायत्री पल्सेस) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT