जळगाव

नागरिकांनो सावधान..जळगाव जिल्ह्यात सोमवार पासून कडक 'कर्फ्यू'

भूषण श्रीखंडे

जळगाव ः जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग थोडा कमी झाला असला तरी कोरोनाची संर्सग साखळी (Coronation chain break) पूर्ण पणे तुटलेली नाही. जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनावश्यक ठिकाणी होणारी गर्दी, रस्त्यावर फिरणारे, गल्ली बोळात, टपऱ्या, हातगाड्यांवर रिकामे उभे राहणाऱ्यांची गर्दी, नियमांचे पालन न करणारे प्रवासी वाहतुक रिक्षा आदीवर सोमवार पासून कडक कारवाई केली जाणार आहे. फक्त सकाळी सात ते अकरा पर्यंत अत्यावश्यक सेवा खुली राहणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी (Collector), पोलिस अधिक्षक (Superintendent of Police), आयुक्तांनी (Commissioner) पत्रकार परिषदेत संयुक्तरित्या माहिती दिली.

(jalgaon dictrict corporation district administration police curfew strictly followed)

गेल्या महिन्याभरापासून राज्यभरात लाॅकडाऊन (Lockdown) सुरू असून जळगाव जिल्ह्यात लाॅकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण काही अंशी कमी झाला असली तरी अपेक्षीत यश अजून आलेले नाही. याबाबत जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन, महापालिका, नगरपालिका अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानुसार आज दुपारी पोलिस अधिक्षक कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, आयुक्त सतिष कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, की जिल्ह्यात संर्सग कमी झाला असला तरी अपेक्षीत यश अजून आपल्याला मिळाले नाही. ही चैन तोडण्यासाठी अजून कडक निर्बंध लावण्याची गरज असून त्याची अमंलबजावणी सोमवार (ता. १७) पासून जिल्ह्यात काटेकोर पणे केली जाणार आहे. तसेच कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांचे नातेवाई रुग्णालयात आत-बाहेर जावून ते सुपर स्रेडर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तेथील रुग्णालयांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांला बाहेरूनच व्हिडीओ काॅल, केअर टेकर, वॅार्ड बायच्या माध्यमातून संपर्क करू द्यावा, त्यांना मधे जावू देवू नये. तसेच लसिकरण केंद्रावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी उपायोजना राबविली असून एक दिवस आगोदर लसिकरणाचे कुपन दिले जाणार आहे. कडक निर्बंधच्या काळात लसिकरणासाठी जाणाऱ्यांनी स्वःताजवळील कुपन, आॅनलाईन रजिष्ठनचा मॅसेज जवळ ठेवावा. जेणे करून त्यांना केंद्रावर जाता येईल असे जिल्हाधिकारी राऊत यांनी माहिती दिली.

बिनाकामी फिरणाऱ्यांवर होणार कारवाई

पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे म्हणाले, की अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असतांना दिसत आहे. तसेच अनावश्य ठिकाणी गर्दी, फिरणे, माॅनिग वाॅक, तसेच मेडिकल, दवाखानाच्या नावाखाली देखील अनेक जण फिरतांना दिसत आहे. तसेच चौकात, टपऱ्यांवर, हातगाड्यांवर अनावश्यक ठिकाणी गर्दी करणाऱ्यांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे. त्यांच्यावर गुन्हे व आर्थिक दंड देखील केला जाणार आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणारे प्रवासी वाहनांवर देखील कारवाई केली जाणार आहे.

फळ-भाजीपाला ठिकाणांवरील गर्दी नियंत्रणात आणणार

महापालिका आयुक्त सतिष कुलकर्णी म्हणाले, की लॅाकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेत असलेले फळ-भाजी विक्रेत्यांना सकाळी सात ते आकरा या वेळेत मुबा दिली होती. परंतू येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे फळ-भाजीपाला विक्री ठिकाणी आता गर्दी नियंत्रणासाठी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमवार पासून कडक कारवाई करणार आहे. नागरिकांनी त्यांच्या जवळच्या ठिकाणांवर जाऊन जे काही खरेदी करायचे आहे ते करावे. अनावश्यक ठिकाणी गर्दी करू नये असा इशारा देखिल आयुक्तांनी यावेळी दिला.

(jalgaon dictrict corporation district administration police curfew strictly followed)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT