corona corona
जळगाव

जळगाव जिल्ह्यात सक्रिय कोरोना रुग्णसंख्या हजाराच्या आत

गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी होऊन २३८ पर्यंत मर्यादित आहे.

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा (corona) संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे चित्र असून, चार महिन्यांत प्रथमच सक्रिय रुग्णांची (Active patients) संख्या हजाराच्या आत आली. गुरुवारी (ता. २४) नवीन ३५ बाधित (New Patient) आढळून आले, तर दिवसभरात १५९ रुग्ण बरे झाले. (jalgaon distict corona active patients low)


जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता मे महिन्याच्या सुरवातीपासून कमी होताना दिसतेय. मे व जून महिन्यात बऱ्यापैकी संसर्ग आटोक्यात आला असून, रिकव्हरी रेटही वाढला आहे. गुरुवारी प्राप्त ३८७३ चाचण्यांच्या अहवालात नवे ३५ बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक लाख ४२ हजार १०७ झाली आहे, तर दिवसभरात १५९ रुग्ण बरे झाले. बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३८ हजार ५७१ वर पोचला आहे. गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात एकाही मृत्युची नोंद झाली नाही. गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी होऊन २३८ पर्यंत मर्यादित आहे.


असे आढळले रुग्ण
जळगाव शहर दोन, जळगाव ग्रामीण चार, अमळनेर दोन, चोपडा एक, पाचोरा एक, धरणगाव चार, एरंडोल दोन, जामनेर चार, रावेर दोन, पारोळा चार, चाळीसगाव तीन, मुक्ताईनगर एक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

SCROLL FOR NEXT