sakal breaking 
जळगाव

सकाळ ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात 24 तासांत कोरोनाचे 13 बळी 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्यात कोरोनाग्रस्तांचे सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण जळगाव जिल्ह्यात असल्याचे समोर आले असून, गेल्या 24 तासांत जिल्ह्यात कोरोनामुळे 13 जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याशिवाय आज 24 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही 762 वर पोचली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. तशी कोरोना बळींची संख्याही झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 13 बाधितांचा बळी गेला असून, आतापर्यंतच्या बळींची संख्या ही 94 वर पोचली आहे. जिल्ह्यात आज आढळलेल्या 24 रुग्णांमध्ये जळगाव शहरात 5, जळगाव ग्रामीण 5, भुसावळ 4, भडगाव 5, रावेर 2, तर अमळनेर, यावल, जामनेर याठिकाणी प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. 

मृत्यूंमध्ये भुसावळ अग्रेसर 
जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण हे जळगाव, भुसावळ व अमळनेर तालुक्‍यात आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक मृत्यू भुसावळ तालुक्‍यात झाले असून, तेथील 27 जणांचा मृत्यू झाला आहे. जळगावातील 15, तर अमळनेरमधील 16 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक बाधित मृत्यूंच्याबाबत भुसावळ हे अग्रेसर दिसत आहे. 

आता तरी दखल घ्यावी 
राज्यासह देशभरातील बाधित मृत्यूचे प्रमाण साडेतीन टक्के इतके आहे. मात्र, जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण हे सुरवातीपासूनच वाढीव होते. गेल्या काही दिवसांपूर्वी हे प्रमाण 10 टक्‍क्‍यांपर्यंत होते. मात्र यामध्ये आता दिवसेंदिवस वाढ होत असून, सद्यःस्थितीत मृत्यूचे प्रमाण हे 12 टक्‍क्‍यांवर आले आहे. आता तरी आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाने मृत्यू रोखण्यासाठी या प्रकाराची गंभीर दखल घेणे आवश्‍यक आहे. 

बरे होणाऱ्यांची संख्या निम्म्यावर 
ज्याप्रमाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्याचप्रमाणे हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सध्या 352 जणांवर वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, 316 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता निम्म्यावर येऊन पोचली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: महावीर जयंतीला बँका सुरू राहणार की नाही? बँका सलग दोन दिवस बंद? RBI काय सांगते

"चालू सीनमध्ये आमच्या नाटकाचं पोस्टर दिसत होतं" प्रियाने सांगितली नव्या वेबसीरिजच्या मेकिंगची आठवण

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो चालकांचा मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर मोर्चा

Mahur News : माहूर मध्ये ‘गैरहजर’ कर्मचाऱ्यांची ‘पंचायत’; गट विकास अधिकाऱ्यांकडून १३ कर्मचाऱ्यांना शो कॉज

Junnar Crop Damage: जुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊस व लिंबाएवढ्या गारांचा कहर; द्राक्ष, कांदा, टोमॅटो, आंबा पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT