Heavy Rain
Heavy Rain 
जळगाव

Alert: जळगाव जिल्ह्यात उद्या अतिवृष्टीचा इशारा

देविदास वाणी



जळगाव : जून ते सप्टेंबरअखेरच्या सरासरीनुसार जिल्ह्यात एकूण सरासरी ६३२.६ पर्जन्यमान आहे. आतापर्यंत ६२०.२ मिलिमीटर पाऊस झाला. त्यानुसार १०४.१ टक्के पावसाची नोंद झाली. दरम्यान, समुद्रात (Sea)तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या मंगळवारी (ता. २८) हवामान विभागाने जिल्ह्यात अतिवृष्टीचा (Heavy Rain) इशारा दिला आहे.


आतापर्यंत सर्वांत जास्त पाऊस चाळीसगावला ८६३.२ मिलिमीटर (१४७.२ टक्के) तर सर्वांत कमी चोपडा तालुक्यात ४४८.३ मिलिमीटर (७१.७ टक्के) झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून ५० वर्षांनंतर प्रथमच गेल्या वर्षी २०२० मध्ये जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ६३२.६०, तर ऑक्टोबरअखेर ६७५.८० सह जानेवारी ते डिसेंबरचे ७१९.७० मिलिमीटर निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान ६६३.३३ मिलिमीटरनुसार गणना होती. २०१९ अखेर सरासरी १२० टक्के पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर हवामान विभागाकडून १९६१ ते २०१० या कालावधीतील जिल्हा व तालुका निहाय पर्जन्यमानाचा अभ्यास करून पर्जन्यमान निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वच १५ तालुकांस्तरासह मंडळ स्तरावर कृषी विभाग कार्यालयात पर्जन्यमान नोंदीनुसार चाळीसगाव ८६३.२, तर चोपडा तालुक्यात ४४८.३ मिलीमिटर पाऊस झाला आहे.


तालुक्यांतील सरासरी पर्जन्यमान :

तालुका--सरासरी पर्यन्यमान-- आतापर्यंतचा पाऊस--टक्के

जळगाव-- ६७३.९-- ५९४.४-- ९३
भुसावळ-- ६०१.२-- ५२२.७--९१.८
यावल-६४२.७ -- ५६०.१-- ९२.१
रावेर--६४६.३-- ६३७.६-- १०५.२
मुक्ताईनगर--५७०.९-- ५३५.५-- ९९.९
अमळनेर--५८८.९-- ५६०.१---१०१
चोपडा--६५९.४-- ४४८.३--७१.७
एरंडोल--६०३.६-- ६३४.९---११०.८
पारोळा--६१९.८-- ७३२.२--१२५.६
चाळीसगाव--६३७.६--८६३.२--१४७.१
जामनेर--६८८.७--७१५.४----११०
पाचोरा--६४५.३--६६२.२--१०९.६
भडगाव--६४६.३-- ६०५.२-- १००.२
धरणगाव--६७८.५-- ५६१.८-- ८८.६
बोदवड-- ६७२.३-- ५७६.६---९२.२
एकूण-- ६३२.६-- ६२०.२--१०४.१ टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''पुढचे पंतप्रधान मोदी नव्हे तर अमित शाह'' केजरीवालांचं मोठं विधान; कारणही सांगितलं

Latest Marathi News Live Update: चाकण परिसरात जोदार पावसाला सुरुवात; अजित पवारांच्या सभेत पावसाचा व्यत्यय

RBI: धक्कादायक! टाटासह 15 कंपन्यांनी NBFC नोंदणी प्रमाणपत्रे केली परत, काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election 2024: जळगावमध्ये अपक्ष आमदाराचा स्वतः एकट्यानंचं प्रचार सुरु; व्हिडिओ व्हायरल

Jalgaon Lok Sabha: रक्षा खडसे आमदार चंद्रकांत पाटलांच्या भेटीला! अक्षयतृतीयेचा मुहूर्त फळाला; पाटील होणार प्रचारात सक्रिय

SCROLL FOR NEXT