corona free
corona free corona free
जळगाव

जळगावच्या सर्व तालुक्यांत कोरोनाचे नव्या रुग्णांची नोंद नाही

सकाळ डिजिटल टीम

दररोज आढळून येणाऱ्या नव्या बाधितांची संख्या नगण्य असताना बरे होणाऱ्यांचा आकडा त्यापेक्षा जास्त आहे.



जळगाव :
जिल्ह्यातून कोरोना (corona) हद्दपार होत असल्याची चिन्हे आहेत. सोमवारी जिल्हाभरात केवळ चोपडा तालुक्यात एकमेव रुग्ण (Corona Patient) समोर आलेला असताना मंगळवारी जळगाव शहर वगळता अन्य सर्व तालुक्यांमध्ये एकाही रुग्णाची नोंद नाही. जळगाव शहरात मात्र ३ नवे बाधित आढळून आलेत.


जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असून महिनाभरापासून संसर्गदरही एक टक्क्यांच्या आत आहे. दररोज आढळून येणाऱ्या नव्या बाधितांची संख्या नगण्य असताना बरे होणाऱ्यांचा आकडा त्यापेक्षा जास्तच असल्याने सक्रिय रुग्णसंख्याही आता ६४पर्यंत खाली आली आहे.



जळगावात ३ नवे रुग्ण

सोमवारी ३८६६ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झालेत. पैकी केवळ १ रुग्ण चोपडा तालुक्यातून समोर आला. मंगळवारी जळगाव शहरातून तीन नवे बाधित आढळून आले. तर अन्य सर्व तालुक्यांमधील आकडा शून्य होता.

मृत्यूची नोंद नाही

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ४२ हजार ६०९ झाली आहे. दिवसभरात ८ रुग्ण बरे झाले असून बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ३९ हजार ९७०वर पोचला आहे. आज सलग एकोणिसाव्या दिवशी जिल्ह्यात मृत्यूची नोंद नाही, ही मोठी समाधानकारक बाब ठरली आहे. सध्या जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ६४ पैकी केवळ १५ रुग्ण ऑक्सिजनवर तर ७ रुग्ण आयसीयूत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Jain Video : राजकारणातून संन्यास घेतल्यानंतर सुरेश जैन यांचा भाजपला पाठिंबा; म्हणाले...

Devendra Fadnavis : मोदी गरिबांचे मसिहा, काँग्रेसने स्वतःची गरिबी हटविली; देवेंद्र फडणवीस यांची टीका

Afghanistan Floods : अफगाणिस्तानमध्ये महापूर, ३०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू; अनेक घरं गेली वाहून

PM Narendra Modi : ''पाकिस्तानकडून कुणीही अणुबाँब खरेदी करत नाही'', मोदींचा काँग्रेसला टोला, म्हणाले...

Shirpur Jain News : पार्श्वनाथच्या मंदिरात पुन्हा तुंबळ हाणामारी, दोन जण जखमी

SCROLL FOR NEXT