जळगाव

हॉटेल्स, रेस्टॉरंटसाठी नवीन नियमावली जाहीर;  बार ९ ते ९ 

देविदास वाणी

जळगाव  : शासनाने राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टारेंट, बार यांना ५० टक्के क्षमतेसह परवानगी दिली आहे. आता ही दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. मात्र, ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीतच हॉटेल्स, रेस्टारेंट, बारमधील खाद्य पदार्थ पेयांचा आस्वाद घ्यावयाचा आहे. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून सर्वांनी दक्षता घ्यावयाची आहे. नियम अटींचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दंड, शिक्षा होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. 

जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रात या सेवा बंद राहतील. इतर क्षेत्रात सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत हॉटेल, बार, रेस्टारेंट सुरू राहतील. चालकांनी सेवा देताना प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांनी सोशल डिस्टन्सींग चे पालन करणे आवश्यक राहील. कोविडची लक्षण नसलेल्यांना प्रवेश देण्यात यावा. प्रवेशद्वाराजवळच ग्राहकाचे तापमान, ऑक्सिजन मोजावा. ऑक्सिजनची पातळी ही ९५% पेक्षा कमी असलेल्यांना प्रवेश देऊ नये. फ्ल्यूची लक्षणे असलेल्या ग्राहकांना प्रवेश नाकारण्यात यावा. अशा ग्राहकांची नोंद स्वतंत्ररीत्या नोंदवही, याबाबत नियंत्रण व देखरेख ठेवण्याची जबाबदारी महापालिका, पालिका/नगरपरिषद यांच्यावर असेल. 

मास्क शिवाय प्रवेशास निर्बंध 
सेवा घेताना ग्राहकाने चेहऱ्यावर मास्क लावावे. सर्व कामगारांनी मास्कचा वापर करावा. सर्वांना हॅंडसॅनिटाईजर उपलब्ध करून द्यावे. शक्‍यतो ग्राहकांकडून डिजिटल पद्धतीने पेमेंट/बिल घेण्यात यावे व कॅश घेताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. दररोज आरामकक्ष व हात धुण्याची ठिकाणी ठरावीक वेळेनंतर निर्जंतुकीकरण करून घेण्यात यावे. ग्राहकांच्या स्वतंत्र प्रवेश व निर्गमनाची व्यवस्था करावी. पार्सल सुविधा पुरविताना ग्राहकाची स्वाक्षरी न घेता पार्सलचा फोटो किंवा पार्सल दिल्याबाबत ईमेल चा वापर करण्यात यावा. दोन टेबलांच्या मध्ये १ मीटर अंतर ठेवावे. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China-Pakistan Relation: सेकेंड स्ट्राइक क्षमतेच्या शोधात पाकिस्तान? चीनकडे अणु पाणबुड्यांची मागणी; मोठी रणनीती उघड

Mumbai Ahmedabad Highway Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची भीषण धडक; ३-४ ठार, २५ हून अधिक जखमी

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा सरकारवर दबाव वाढला! वेतन आयोगासमोर कर्मचाऱ्यांच्या ‘या’ मोठ्या मागण्या

नवरा कोट्यवधींचा मालक तरीही लोकप्रिय अभिनेत्रीवर आली शेण उचलायची वेळ? व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही इंधन तुटवडा, इंधनाअभावी अनेक पेट्रोल पंप बंद

SCROLL FOR NEXT