जळगाव

मोठा दिलासा; जळगाव जिल्ह्यातील दुकाने आता सात ही दिवस खुली राहणार !

देविदास वाणी

जळगाव : मिशन बिगीन अगेनअंतर्गत सूट देत  व अर्थचक्रास गती देण्यासह गर्दी टाळण्यासाठी 15 ऑक्टोबर 2020 पासून सप्ताहातील सातही दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश बुधवारी रात्री जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहेत.

यासोबतच ग्रंथालय आठवडे बाजार देखील सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून शाळांमध्ये 50 टक्के शिक्षकांना उपस्थित राहता येणार आहे. 15 ऑक्टोबर पासूनच याची अंमलबजावणी होणार आहे. तसेच चित्रपट गृह, धार्मिक स्थळे, शाळा महाविद्यालय मात्र बंदच राहणार आहेत. 


कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी 31 आॅक्टोबर 2020 पर्यंत वाढवण्यात आला असला तरी मिशन बिगिन अगेनअंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी विविध सुधारणा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार 14 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने आदेश काढल्यानंतर जिल्हा प्रशासनाने देखील आदेश जारी केले. त्यानुसार आता ग्रंथालय सुरू होणार आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून नियमावली जारी करण्यात येणार आहे.यासोबतच आठवडे बाजार, बगीचे पार्क मोकळ्या जागा मनोरंजनासाठी सुरू ठेवता येणार आहेत.

जळगावात शनिवार व रविवार बाजारपेठ बंद राहात होती. आता ही अट शिथिल करण्यात आली असून सोमवार ते रविवार असे सातही दिवस बाजारपेठ सकाळी 9 ते रात्री 9 यावेळेस सुरू राहणार आहे.

शाळांमधील 50 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ऑनलाइन शिक्षण, टेली काउंसलिंग व शाळेतील इतर कामकाजासाठी शाळेत उपस्थित राहण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून नियमावली निर्गमित करण्यात येईल. यासोबतच विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांना व पीएचडीसाठी उपस्थित राहण्याचीदेखील मुभा देण्यात आली आहे.  

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Motor vehicle tax: जुनी वाहने स्क्रॅप केल्यास मोठी करसवलत मिळणार! महायुती सरकारची मोठी घोषणा; प्रदूषण करणारी वाहने बंद करणार

जॉनी लिव्हरच्या लेकाला 12व्या झालेला ट्युमर ! पहिली सर्जरी फेल, दुसरी अमेरिकेत; "त्यावेळी फादरच्या रूपात.."

नागपूरला स्फोटाची राजधानी करायची आहे का? एसबीएल कंपनी स्फोटप्रकरणी अद्याप कारवाई नाही, अनिल देशमुख संतापले...

Latest Marathi News Live Update : १४ हजारासाठी विधवा महिलेचा खून, आरोपीस अकोटमधून अटक

रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी एक महिन्याची सूट? अमेरिकेच्या दाव्यावर भारत सरकारची स्पष्टता, काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT