जळगाव

कापुस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांना टोकन दिल्यास कारवाई 

देविदास वाणी

जळगाव : किमान आधारभूत दराने करण्यात येत असलेली कापूस खरेदी पारदर्शीपणे पार पाडा. कापूस खरेदीचे टोकन देताना शेतकऱ्यांना अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना टोकन दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करू, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला.

 
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सहकार, कापूस पणन महासंघ व सीसीआयच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक आर. डी. होले, उपव्यवस्थापक ए. बी. निकम, जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रसाद पाटील, जळगावचे आर. के. पाटील, पारोळाचे आर. डी. चौधरी, चोपडाचे एन. आर. सोनवणे, सीसीआयचे सहाय्यक प्रबंधक दिनेशकुमार, केंद्र प्रभारी प्रमोद पाटील उपस्थित होते.

 शेतकरीहितास प्राधान्य द्यावे
जिल्हाधिकारी म्हणाले, की कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या हितासाठी आहेत. त्यामुळे किमान आधारभूत दराने कापूस खरेदीप्रक्रिया राबविताना शेतकरीहितास प्राधान्य द्यावे. कापूस खरेदी केंद्रावर खरेदी करताना शेतकऱ्यांचा कापूस कमीत कमी वेळात घेता येईल, यासाठी नियोजन करावे. 

टोकन देताना चित्रीकरण होणार 
शेतकऱ्यांना खरेदीचे टोकन देताना त्याचे चित्रीकरण करणे आवश्यक आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येणार नाहीत. कटोतीबाबत तक्रारी येणार नाही, याची काळजी घ्या. सद्यःपरिस्थितीमध्ये जिल्ह्यात सीसीआय व कापूस पणन महासंघामार्फत जिल्ह्यातील दहा तालुक्यांत एकूण ३४ केंद्रांवर कापूस खरेदी सुरू असून, आतापर्यंत सीसीआयच्या ११ केंद्रांवर तीन हजार ६५४ शेतकऱ्यांचा एक लाख ४० हजार ९३९ क्विंटल कापूस खरेदी केला आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक बिडवई यांनी बैठकीत दिली 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT