corona positive
corona positive 
जळगाव

धोका वाढला; चोवीस तासांत 50 रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरांसह जिल्ह्यातील ग्रामीण भागही "कोरोना'ने व्यापला असून, सर्वच तालुक्‍यांमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात 50 नवे रुग्ण आढळून आले असून, "कोरोना'बाधितांची संख्या 621 वर पोहोचली आहे. 
जिल्ह्यात दररोज नवनवीन भागात "कोरोना'चे रुग्ण आढळून येत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाण देखील जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक असल्याने राज्य सरकारची डोकेदुखी वाढलेली आहे. आज रावेर, सावदा, भुसावळ, जळगाव, फैजपूर, धरणगाव, चाळीसगाव, चोपडा, वरणगाव, एरंडोल, भडगाव, निंभोरा, रावेर येथील 320 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यातील 270 अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर 50 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 621 इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. 

आढळलेले रुग्ण 
जिल्हाभरात आज 50 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये जळगावातील 11, भुसावळच्या 5, चाळीसगाव-4, चोपडा - 6, धरणगाव 3, वरणगाव -5, एरंडोल-3, फैजपूर 2, सावदा 2, पारोळा -4, निंभोरा (ता. रावेर) 2, भडगाव, शिरपूर, बोरकुल येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. 

प्रशासनाची डोकेदुखी वाढली 
जिल्ह्यात दररोज "कोरोना'ग्रस्तांची संख्या वाढत आहे. एकीकडे जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. मात्र, नागरिकांकडून त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी चांगलीच वाढलेली आहे. 

शहरात नवीन भागात रुग्ण 
शहरात आज "कोरोना'चे 11 रुग्ण आढळून आले आहे. यातील आज आलेल्या अहवालांमध्ये आशाबाबा नगरातील 53 वर्षीय महिला आहे तर विठ्ठलपेठ, ढाकेवाडी, कासमवाडी, खोटेनगर या ठिकाणी आढळून आलेले पुरुष आहे. हे नवीन परिसर कोरोनाच्या विळख्यात आल्याने या महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. 

जिल्ह्यात जळगाव अव्वल 
जिल्हाभरात "कोरोना'बाधितांचा आकडा 621 झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून "कोरोना'चा प्रसार रोखण्यासाठी दिवसरात्र काम केले जात आहे. गेल्या महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत अमळनेर तालुका अग्रभागी होता. मात्र, आता जिल्ह्यात जळगाव शहरात सर्वाधिक रुग्ण असल्याने जळगाव शहर अव्वल ठरले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. प्रणिती शिंदे, आदिती तटकरे, शाहू महाराजांनी केलं मतदान

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT