Covid-19 
जळगाव

बोदवडने वाढवली संसर्गाची चिंता;चार दिवसांत १५ नवे रुग्ण

Jalgaon Corona News : जळगाव जिल्ह्यात रोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या दहा- पंधराच्या आतच राहिलेली आहे.

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा (Corona) संसर्ग नियंत्रणात असताना बोदवड तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांत तब्बल १५ नव्या रुग्णांची नोंद (New Patient) झाल्याने चिंता वाढली आहे. मंगळवारी (ता. १७)ही बोदवड तालुक्यातील ६ रुग्णांसह जिल्ह्यात ९ नवे बाधित आढळून आले. तर अवघे ३ रुग्ण बरे झाले.


जळगाव जिल्ह्यात दोन महिन्यांपासून कोरोनाचा उतरता आलेख कायम आहे. संपूर्ण जुलै महिन्यात जिल्ह्यात रोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या दहा- पंधराच्या आतच राहिलेली आहे. असे असताना गेल्या तीन-चार दिवसांपासून बोदवड तालुक्यात काही प्रमाणात संसर्ग वाढू लागला आहे.

सर्वांत प्रथम कोरोनामुक्त झालेल्या बोदवड तालुक्यात या तीन-चार दिवसांतच १५ रुग्ण समोर आलेत. मंगळवारी प्राप्त झालेल्या १ हजार ५९७ अहवालांमध्ये ९ नवे रुग्ण समोर आले असून, त्यापैकी ६ रुग्ण बोदवड तालुक्यातील आहेत. तर जळगाव ग्रामीण १ व भुसावळ २ असे रुग्ण सापडले. तुलनेत अवघे ३ रुग्णच बरे झालेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता १ लाख ४२ हजार ६७० झाली असून बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ४० हजार ६०वर पोचला आहे. सक्रिय रुग्णसंख्या आता वाढून ३५वर पोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025, RCB vs LSG: रिषभ पंतच्या लखनौसमोर आज धडाकेबाज बंगळुरू संघाचे पारडे जड आव्हान, कशी असेल Playing XI

Sports News: टी-२० विश्वकरंडक विजेत्या संजू सॅमसनला ICC पुरस्कार; मार्च महिन्यासाठी सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Sports News: १७ वर्षांखालील मुलींचा विजय: महाराष्ट्राने सौराष्ट्र संघावर ८ गडी राखून मात; ईश्वरी अवसरेच्या अर्धशतकाने महाराष्ट्राच्या जिंकण्याची शर्यत मजबूत

Success Story: वडील वॉचमन, आई शिवणकाम करते; लेकीनं २०व्या वर्षी पूर्ण केलं खाकीचं स्वप्न!

SCROLL FOR NEXT