vaccine corona vaccine
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध लसींचा साठा संपण्याच्या मार्गावर

कोरोनावर लस हाच प्रतिबंधात्मक उपाय असल्याची जाणीव नागरिकांना झाल्याने नागरिकांनी लस टोचून घेण्यासाठी सर्वच केंद्रांवर रांगा लावण्याचे चित्र पाहावयास मिळाले.

देविदास वाणी

जळगाव ः जिल्ह्यात तब्बल सात दिवसांनी कोरोना लसींचा पुरवठा झाल्याने बुधवार (ता. १४)पासून ११३ लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू झाले होते. शुक्रवारी (ता. १४) मात्र सायंकाळी उपलब्ध लसींचा साठा संपण्याच्या मार्गावर आहे. नवीन मागविलेला लसींचा साठाही उपलब्ध झाला नाही. यामुळे शनिवारी (ता.१७) केंद्रे सुरू बंद राहण्याची शक्यता असल्याने लसीकरण मोहीम पुन्हा थांबणार आहे.

मंगळवारी (ता. १३) ४० हजार २०० लसी उपलब्ध झाल्याने शहरातील बहुतांश सर्वच लसीकरण केंद्रे सुरू झाली आहेत. ग्रामीण भागातही बुधवार (ता.१४)पर्यंत लस पोचणार असल्याने ग्रामीण भागातील लसीकरणही सुरू झाले. कोरोनावर लस हाच प्रतिबंधात्मक उपाय असल्याची जाणीव नागरिकांना झाल्याने नागरिकांनी लस टोचून घेण्यासाठी सर्वच केंद्रांवर रांगा लावण्याचे चित्र पाहावयास मिळाले. शहरात बुधवारपासून सर्वच लसीकरण सुरू होते. यामुळे नागरिकांनी लसींसाठी गर्दी केली होती. शहरातील रेडक्रॉस सोसायटी, रोटरी भवन, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, शिवाजीनगर रुग्णालय व खासगी ठिकाणी लसीकरणासाठी गर्दीचे चित्र होते. जिल्ह्यासाठी आणखी एक लाख लसी मागविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. मात्र त्या अद्यापही उपलब्ध झालेल्या नाहीत. उपलब्ध लस संपल्यानंतर केंद्रे बंद करावी लागणार आहेत. जेव्हा लसी उपलब्ध होतील, तेव्हा पुन्हा लसीकरण सुरू होईल.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT