covid 19 covid 19
जळगाव

जिल्हा कोविड रुग्णालयांवर आता सोळा शिक्षकांची नियुक्ती

संशयित रुग्णांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे.

देविदास वाणी

जळगाव ः जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या मुळे जिल्हा कोविड रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयात विषाणू बाधित/ संशयित रुग्णांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, रुग्णालयात दाखल होण्यासाठी विलंब होऊ न देणे, आवश्यकतेप्रमाणे बेड्स उपलब्ध करून देणे, आय. सी. यू. मध्ये दाखल असणाऱ्या व क्रिटिकल असणाऱ्या रुग्णांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी सोळा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली.

यापूर्वीही या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती, हाउस किपिंग, जेवणाची सुविधा व इतर तत्सम सुविधा याबाबींच्या अनुषंगाने येणाऱ्या प्रशासकीय, तसेच नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी संबंधित आस्थापनेच्या अधिकारी/कर्मचारी यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, समन्वय राखणे याकरिता तीन नोडल अधिकारी नेमले आहेत. आता विविध कामांसाठी सोळा शिक्षकांची नियुक्ती करीत आहेत.

शिक्षकांनी करावयाच्या महत्त्वाच्या बाबी

* रुग्णांना दाखल होताना अडचणी सोडविणे

* बेड मॅनेजमेंट करणे

* व्हिडिओ कॉलद्वारे पाहणी करणे

* रुग्णांना एकदा तरी भेटणे

* रुग्ण गंभीर होत असल्याचे लक्षात येताच तशी सूचना डॉक्टरांना देणे

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT