Vaccination 
जळगाव

जळगाव जिल्ह्याला सहा लाखांवर डोस मिळणार;‘मिशन कवच कुंडल’अभियान

आगामी काळात आणखी ४ लाख डोस उपलब्ध होणार आहेत. या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिमेस वेग देण्याचे नियोजन आहे.

सकाळ वृ्त्तसेवा

जळगाव : कोरोना (Corona) विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत ‘मिशन कवच कुंडल’ अंतर्गत कोविड- 19 विशेष लसीकरण मोहीम (Covid- 19 Special Vaccination Campaign) राबविण्यात येत आहे.


जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज दुपारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधला. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. पांढरे, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते.

अडीच लाख डोस प्राप्त
जिल्ह्यात लसीचे अडीच लाख डोस आलेले आहेत. आगामी काळात आणखी ४ लाख डोस उपलब्ध होणार आहेत. या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिमेस वेग देण्याचे नियोजन आहे. आरोग्य यंत्रणेने लोकप्रतिनिधींसह तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, स्वयंसेवी, सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. त्याचबरोबर रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड, धार्मिक स्थळे, मंदिरे आदी ठिकाणी लसीकरणासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे.

आतापर्यंत १४ लाखांवर डोस
जिल्ह्यात आतापर्यंत १८ लाख ४७ हजार नागरिकांनी पहिला डोस तर ६ लाख ६ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. अद्याप ज्या नागरीकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला नसेल त्यांनी तातडीने पहिला डोस घ्यावा. तसेच ज्या नागरिकांना पहिला डोस घेऊन पुरेसा कालावधी झाला असेल त्यांनी दुसरा डोस घ्यावा. विविध सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांनीही लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 39 लाख; या शेअरने दिला 3900% रिटर्न! अजूनही 80% वाढण्याचा ब्रोकरेजचा अंदाज

IPL 2026: सूर्याला धुरंधरची 'क्रेझ' Video Viral

Shaktipith Highway Sangli : शक्तिपीठ महामार्गातून सांगलीतील १९ गावे वगळली, नवीन मार्ग जयंत पाटलांची डोकेदुखी वाढवणार

Financial Risk Management : शेअर बाजार कोसळला तरी टेन्शन नाही! जोखीम व्यवस्थापनाचे 'हे' सोपे नियम प्रत्येक गुंतवणूकदाराला माहित हवेत

वयाच्या ५७ व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढला हा अभिनेता; पत्नीच्या इच्छेसाठी घातला सगळा घाट; लग्नाचे फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT