Ganesh Utsav) 
जळगाव

जळगावमध्ये गणेशोत्सवात कोरोनाचे ‘विघ्न’ नियंत्रणात

गणेशोत्सव धडाक्यात साजरा होणार, अशी स्थिती असताना संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका म्हणून उत्सवावर यंदाही निर्बंध आलेत.

सचिन जोशी


जळगाव : गणेशोत्सवात (Ganesh Utsav) प्रतिष्ठापना झालेल्या विघ्नहर्त्याने कोरोना (Corona) संसर्गाचे विघ्न बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. उत्सवातील दहा- अकरा दिवसांत अवघे १० नवे रुग्ण समोर आले, तर त्या तुलनेत २७ रुग्ण बरे झाले.


गेल्या दीड वर्षापासून जगभरात कोरोनाचा प्रकोप सुरु असून त्यामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सवावर विरजण पडले. दुसऱ्या लाटेनंतर मे महिन्यापासून संसर्ग कमी व्हायला सुरुवात झाली. जुलै, ऑगस्ट महिन्यात नव्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आली. गणेशोत्सव धडाक्यात साजरा होणार, अशी स्थिती असताना संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका म्हणून उत्सवावर यंदाही निर्बंध आलेत. त्या स्थितीतही गणेशभक्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी साधेपणाने पण, तेवढ्याच श्रद्धा-भक्तीने उत्सव साजरा केला.


विघ्नहर्त्याने केले विघ्न दूर
काही वैद्यकीय संस्था, संघटनांनी सप्टेंबरमध्ये तिसरी लाट येण्याचा धोका वर्तवला होता. मात्र, गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठेत गर्दी होऊनही कोरोना संसर्ग नियंत्रणात राहिला. विघ्नहर्त्याने कोरोनाच्या संसर्गाचे विघ्न पूर्णपणे नियंत्रणात ठेवले. जळगाव जिल्ह्यात उत्सवातील गेल्या १० दिवसांत अवघे १० नवे रुग्ण आढळून आले, तर या दिवसांत २७ रुग्ण बरे झालेत. या दहा दिवसांत तब्बल चार दिवस एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. उर्वरित ६ दिवसही प्रत्येकी १-२ रुग्णच समोर आले. उत्सवापूर्वी जवळपास तीसच्या घरात असलेली जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या उत्सव संपल्यानंतर अवघ्या १० पर्यंत मर्यादित राहिली.


अशी राहिली स्थिती
तारीख----- नवे रुग्ण-- बरे झालेले

१० सप्टें.---२--------२
११--------२----------२
१२---------३---------४
१३---------०---------३
१४---------१---------२
१५---------१---------१
१६---------०---------२
१७----------२--------०
१८---------०--------३
१९--------०--------५
२०--------१--------३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Accident: दुर्दैवी! महापालिकेच्या कंट्राती कचरा गाडीखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू, आईचा मन हेलावणारा टाहो

CharDham Railway News : बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीला रेल्वे मिरज, सांगली मार्गे सुरू, महाराष्ट्र, कर्नाटकातील प्रवाशांना दिलासा

पाकिस्तानने पेट्रोल-डिझेलच्या दरात केली कपात; किती रुपये लीटर दरानं मिळतंय इंधन?

अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाणने इतक्या घाईघाईत साखरपुडा का केला? स्वतः सांगितलं कारण

Gorakhpur Stadium: आता IPL सामने गोरखपूरमध्ये? योगींच्या मेगा क्रिकेट स्टेडियम प्रोजेक्टची जोरदार चर्चा; जाणून घ्या वैशिष्ट्ये!

SCROLL FOR NEXT