जळगाव

जिल्हा रुग्णालयात मशिनरी खरेदीत अफरातफर ?

रईस शेख

जळगाव  : जिल्हा रुग्णालयात मेमोग्राफी व फेको मशिनसह इतर महागडी वैद्यकीय यंत्रसामग्री खरेदी करताना मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे. यासंदर्भात जिल्‍हा शल्यचिकित्सकांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार शिवसेनेचे गजानन मालपुरे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे. 

मालपुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे जळगाव जिल्हा रुग्णालयात मॅमोग्राफी मशिन, फेको मशिनसह इतर मशिनरी खरेदी करताना मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे. या मशिनरी एकाच व्यावसायिकाकडून खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यांची बिले घेताना बिलांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे नावसारख्या अत्यावश्यक गोष्टीही नमूद केलेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही ऑनलाइन मशिनच्या किमती बघितल्या असता जिल्हा ग्रामीण रुग्णालय आणि घेतलेल्या मशिनरीच्या किमती व ऑनलाइन असलेल्या किमतीत प्रचंड तफावत दिसून येत आहे. तरी जिल्‍हा शल्यचिकित्सक नागोजी चव्हाण यांनी खरेदी केलेल्या मशिनरीच्या किमतींमध्ये तफावत असल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे दिसते. या प्रकरणात तज्ज्ञ अभ्यासकांची समिती नेमून मशिनरी खरेदीसाठी व इतर रुग्णांसाठी अत्यावश्यक सर्व बाबींची चौकशी करण्यात यावी.

तालुक्याच्या ठिकाणी मशिनरी खरेदी करून दोन-तीन वर्षे होऊनही त्या हाताळणाऱ्या तज्ज्ञ व्यक्ती, डॉक्टर उपलब्ध नसताना या मशिनरी खरेदी करून शासनाच्या पैशांचा अपव्यय केल्याचे आढळून आले आहे. या सर्व बाबींची सविस्तर चौकशी करून जिल्‍हा शल्यचिकित्सक चव्हाण यांच्यासह दोषी व्यक्तींवर फौजदारी व शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात यावी. याबाबतचे सविस्तर आणि योग्य ते पुरावे देण्यास आम्ही तयार आहोत, असेही मालपुरे यांनी या तक्रारी अर्जात नमूद केले आहे. दरम्यान, या तक्रारी अर्जाच्या प्रती राज्यपालांसह मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

PSL 2026 : पाकिस्ताच्या मुश्ताक अहमदचा उद्धटपणा... Live TV वर इंग्लंडच्या खेळाडूची लाज काढायला गेला अन् मग... Video Viral

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातची SIT कडून सलग १०व्या दिवशी चौकशी

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! युद्ध सुरू झाल्यापासून सोनं 17% कोसळलं; आजचा भाव किती?

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणातील 'त्या' पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याने 65 जणांवर गुन्हा; तुमच्याही मोबाईलमध्ये 'ते' व्हिडिओ आहेत?

SCROLL FOR NEXT