जळगाव

खळबळजनकः जिल्हा कारागृहात कैद्याकडे सापडला मोबाईल

रईस शेख

जळगाव: जळगाव जिल्हा कारागृहाच्या ब्यारेक नंबर सहा मध्ये तपासणी दरम्यान कैद्यांकडे मोबाईल मिळून आला आहे. त्यामुळे आज पुन्हा कारागृहात खळबळ उडाली आहे. काही दिवसापुर्वीच तीन कैद्यी कारागृहातून पळाले होते, त्यामुळे जिल्हा कारागृहातील सुरक्षा यंत्रणेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

जळगाव जिल्हा कारागृह सुरक्षारक्षकाच्या डोक्याला पिस्तूल लावून तीन कायद्यांनी पलायन केले होते. यामुळे जिल्हा कारागृहाची सुरक्षा यंत्रणेवर अनेक प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले होते. तसेच कैदी पळाल्यानंतर तिसऱया दिवशी कैद्यांना पार्सल देण्याचे देखील प्रकरण समोर आले होते. त्यात हे प्रकरण ताजेच असतांना आज कारागृहातील ब्यारेक नंबर 6 मधील कैदी वापरात असलेला मोबाईल मिळून आल्याने एकच खळबळ उडाली. 

इलेक्ट्रिक बोर्डाच्या मागे मोबाईल लपवलेला
कारागृह अधीक्षक जोसेफ गायकवाड यांच्या सूचनेवरून कर्मचारी अरविंद पाटील यांनी ब्यारेक ची झडती घेतली. झडती घेत असतांना कर्मचारी पाटील यांना विद्युत बोर्डाच्या मागे हा मोबाईल लपवून ठेवला सापडला. कारागृह अधीक्षकांनी तात्काळ ब्यारेक मधील सर्व कैदी दुसऱ्या बॅरेकमध्ये कैद्यांना पाठवीले. याप्रकरणी गुन्हा हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मोबाईल नेमका कोणाचा आहे व तो किती दिवसापासून वापरात होता, याची माहिती अद्याप समोर आलेले नसून कारागृहाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

फरार आरोपींचा अजून थांगपत्ता नाही
गेल्या पंधरा दिवसापूर्वी जिल्हा कारागृहातून अट्टल गुन्हेगारांनी सुरक्षा रक्षकाची रिव्हॉल्वर हिसकून त्याचा धाक दाखवून कारागृहातून पलायन केले होते. तेव्हापासून पोलिस दल या कैद्यांच्या मागोवावर असून अनेक ठिकाणी शोधासाठी पथके देखील पाठविण्यात आले आहे. परंतू अजून पोलिसांना हे पलायन केलेले कैद्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. 
 

संपादन-भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: ससूनमधून परतले, जेवणासाठी महामार्गावर उतरले; काही क्षणांतच सहाय्यक फौजदारावर काळाचा घाला, अज्ञात वाहनाची धडक अन्..

Latest Marathi News Update : शिरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत; झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला

मामा-भाच्यात असं काय घडलं? राजगुरूनगरमध्ये धक्कादायक घटना |

Rohit Sharma: वडापाव नाही, तर टेन्शनच्या वेळी आईच्या हातचा 'हा' पदार्थ आहे कम्फर्ट फूड; रोहितने केला खुलासा

Satara Accident News: ४६ दिवस मृत्यूशी झुंज; बंगळूर महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी प्रतीक काळभोरचा अखेर मृत्यू, एकुलता एक मुलगा गमावला

SCROLL FOR NEXT