Lonely Children Lonely Children
जळगाव

जळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे १९१ बालकांनी गमावले पालक

पालक गमावलेल्या बालकांचे तातडीने सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा.

देविदास वाणी


जळगाव ः जिल्ह्यात सध्या दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची (Children) संख्या नऊ असून, पैकी सात बालके १८ वर्षांच्या आतील, तर दोन बालके १८ वर्षांवरील आहेत. एक पालक मृत्यू (Death) पावलेल्या बालकांची संख्या १९१ आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे (Corona) एक किंवा दोन्ही पालक गमावलेली बालके, त्यांच्या कुटुंबांना शासकीय यंत्रणांनी आवश्यक त्या सुविधांसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे आदेश कृती दलाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी बुधवारी (ता. २) येथे दिले.

(jalgaon district one hundred ninety one children parents death)


जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच्या काळजीसाठी गठित जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक बापू रोहोम, जिल्हा बालकल्याण समितीच्या वैजयंती तळेले व इतर अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, की कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देत त्यांच्या संगोपनासाठी उपाययोजना वेळेत पूर्ण करावयाच्या आहेत. पालक गमावलेल्या बालकांचे तातडीने सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा. त्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, मुख्याधिकाऱ्यांनी सहकार्य करावे. अशा बालकांच्या संपर्कात राहत त्यांची नियमितपणे आरोग्य तपासणी होईल, याची दक्षता घ्यावी. या बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून द्यावा.

parents death


विधवांना मदत, रोजगारही
कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना पात्रतेचे निकष तपासून शासनाच्या विविध निराधार योजनांचा लाभ द्यावा. शिवाय त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी द्यावी. बालके नातेवाइकांकडे राहत असतील, तर त्यांचा नियमानुसार सांभाळ करण्याबाबत सूचना देणे, दत्तक प्रक्रियेची आवश्यकता कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या.

अशी आहे आकडेवारी


जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेली बालके : ९
* सात बालके : १८ वर्षांच्या आतील
* दोन बालके : १८ वर्षांवरील
* एक पालक मृत्यू पावलेली बालके : १९१
* १३४ बालके : १८ वर्षांखालील
* ५२ बालके : १८ वर्षांवरील
* पाच बालके : एक वर्षाखालील

Lonely Children


१५३ महिलांनी गमावले कुंकू
जळगाव महापालिकेकडून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या ३१९ पालकांची यादी प्राप्त झाली आहे. त्याची पडताळणी करण्याची कार्यवाही सुरू आहे. दवाखान्यात दाखल असलेल्या पालकांची संख्या ११ असून, कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांची संख्या १५३ असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी परदेशी यांनी सांगितले..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकांकडून छळ… दिल्ली मेट्रो प्लॅटफॉर्मवरून उडी मारत जीवन संपवलं! शेवटचं वाक्य अंगावर काटा आणणारं

Latest Marathi News Update LIVE : जळगावमध्ये शिवारात 23 लाखांची 'गांजाची शेती' केली उद्ध्वस्त

Bihar Probable Ministers List : नितीशकुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर!

Amravati Crime: अमरावती हादरली! युवकाची पूर्ववैमनस्यातून हत्या

Bicycle Riding: 'सोलापूरच्या चौघांनी के२के सायकल रायडिंगमध्ये रचला इतिहास'; काश्मीर ते कन्याकुमारी १६ दिवसांमध्ये ४२०० किमी प्रवास पूर्ण..

SCROLL FOR NEXT