village village
जळगाव

हरताळा,पातोंडा,ऐणगाव या गावांचा`रुरबन`अंतर्गत होणार विकास

राष्ट्रीय रुरबन मिशन नियामक समितीची बैठक जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

देविदास वाणी


जळगाव ःकेंद्र शासनाच्या (Central government) डॉ. शामाप्रसाद मुखर्जी (Dr. Shamaprasad Mukherjee) राष्ट्रीय रुरबन (Rurban scheme) अंतर्गत हरताळा (ता.मुक्ताईनगर) गावसमुह, पातोंडा (ता.चाळीसगाव) गावसमुह व ऐणगाव (ता.बोदवड) गावसमुहाची निवड करण्यात आली. या समूहातील गावांमध्ये शहराप्रमाणे पायाभूत सुविधा पुरविणे, कृषी व कृषीशी संलग्न असणाऱ्या क्षेत्रांना विशेष प्राधान्य देण्यासाठी यंत्रणांनी कामे सुचवून ती तातडीने सुरू करावी. ही कामे सुरू करताना काही अडचणी असल्यास संबंधित विभागाशी समन्वय साधून अडचणी दूर कराव्या. या कामांची नोंद करुन त्यांचे जिओ टॅगींग करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Abhijeet Raut) यांनी आज येथे दिल्या.
(jalgaon district three village selection rurban scheme)

राष्ट्रीय रुरबन मिशन नियामक समितीची बैठक जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्यांनी वरील आदेश दिलेत. ते म्हणाले, की केंद्र शासनाच्या डॉ. शामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अभियान अंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कामांना गती देण्याबरोबर अद्याप जी कामे सुरू व्हावयाची आहेत ती कामे सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने सुरू करावी.


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.. पंकज आशिया, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सी.एम.सिन्हा, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिगंबर लोखंडे, मुक्ताईनगर, बोदवड, चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.


३४२ कोटींची कामे होणार
या अभियानांतर्गत हरताळा गाव समूहातील सहा गावांमध्ये ३४२.९६ कोटी रुपयांच्या ३१० कामांची नोंद करावयाची आहे. त्यापैकी २०१ कामांची नोंद केली आहे. तर १९३ कामांचे जिओ टॅगिग करण्यात आले आहे. पातोंडा गाव समूहातील चार गावांमध्ये ९७.०३ कोटी रुपयांच्या २१६ कामांची नोंद केली आहे. तर ९५ कामांचे जिओ टॅगिंग करण्यात आले आहे. ऐनगाव गाव समूहातील चौदा गावांमध्ये ७१.५५ कोटी रुपयांच्या १४५ कामांची नोंद करावयाची असून त्यापैकी ४६ कामांची नोंद केली असल्याची माहिती सदस्य सचिव लोखंडे यांनी बैठकीत दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT