जळगाव

दिलासादायक ! जळगाव जिल्ह्यातील २५ कोविड केअर सेंटर बंद

जिल्हा कोविड रुणालयातील रुग्णांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे

देविदास वाणी



जळगाव ः शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची (corona patient) संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे तब्बल २५ खासगी कोविड केअर सेंटरचालकांनी (Covid Care Center) सेंटर बंद केले आहे. एकूण ११८ खासगी कोविड केअर सेंटर जिल्ह्यात सुरू होती. फेब्रुवारीत वाढलेली कोरोनाबाधितांची संख्याही आता निम्म्यावर आली आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला (Administration) यश आले आहे.

(jalgaon district twenty five covid care center close)

फेब्रुवारी महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या १२ हजारांपर्यंत पोचली होती. हा कोरोना महामारीतील रुग्णांचा उच्चांक होता. तो दिवसेंदिवस खाली आला आहे. कालपर्यंत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सहा हजार ५३९ वर येऊन ठेपली आहे, तर रोज आढळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही १९४ वर आली आहे. खासगी कोविड सेंटरमधील रुग्ण कमी झाल्याने खासगी डॉक्टरांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना कोविड केअर सेंटर बंद करीत असल्याचे सांगून सेंटर बंदही केले आहे. जिल्हा कोविड रुणालयातील रुग्णांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. सध्या जिल्हा रुग्णालयातील दोनशेच्या जवळपास बेड रिकामे आहेत.

अशी आहे आकडेवारी...
एकूण आतापर्यंत कोरोनाबाधित--१ लाख ३९ हजार ३३१
आतापर्यंत एकूण बरे झालेले--१ लाख ३० हजार २७६
सध्या ॲक्टिव्ह रुग्ण--६ हजार ५३९
आतापर्यंत एकूण मृत्यू--२ हजार ५१६


जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. दुसरी लाट आता संपण्याच्या मार्गावर आहे. २५ खासगी कोविड केअर सेंटर बंद करण्यात आली आहेत. नागरिकांनी नेहमी मास्क वापरला, सोशल डिस्टन्स पाळले, गर्दीत जाणे टाळले तर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर येण्यास वेळ लागणार नाही.
- डॉ. एन. एस. चव्हाण,
जिल्हा शल्यचिकित्सक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar : १४ आक्षेप, १६.१० लाख अपील... निवडणूक आयोगात पडद्यामागे काय घडलं? ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये उज्ज्वल निकम यांनी जिंकली प्रेक्षकांची मन, जिंकलेली रक्कम दान करण्याचा निर्णय

Gokul Election: ‘कप-बशी’ चिन्हासाठी प्रतिष्ठेची लढाई;सतेज पाटील गटाचा पहिला, त्यानंतर महायुतीचा अर्ज

Maharashtra Ganesh Visarjan Live: मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत स्व-रूपवर्धिणी मल्लखांब पथकाचे थरारक सादरीकरण

Gyanesh Kumar Resignation : कॉकरोच जनता पार्टी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात रस्त्यावर उतरणार; गांधी जयंतीला देशव्यापी आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT