Vaccination 
जळगाव

जळगावः ‘मिशन कवचकुंडल’ कोविड लसीकरणाला अल्प प्रतिसाद

लस कमी उपलब्ध झाल्या अन् नागरिकांनीही लसीकरणाकडे पाठ फिरविल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे.

देविदास वाणी


जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे २६ लाख ३० हजार ७४३ नागरिकांना लसीकरण (Vaccination) झालेले आहे. १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या ३४ लाख आहे. त्या सर्वांना कोरोना प्रतिबंधक लशींचे दोन डोस देणे अपेक्षित आहे. मात्र अद्यापही आठ लाख नागरिकांनी लशींचा एकही डोस घेतलेला नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग (Corona infection) रोखण्यासाठी ‘मिशन कवचकुंडल’ अंतर्गत कोविड विशेष लसीकरण मोहीम ८ ऑक्टोबरपासून सुरू झाली. त्यालाही अल्प प्रतिसाद मिळाला. एक लाख २३ हजार नागरिकांनीच या मोहिमेत लसीकरण करून घेतले आहे.


जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ ला कोविड लसीकरण मोहीम सुरू झाली. अगोदर फ्रंटलाइन वर्करांना लसीकरण, नंतर महसूल, पोलिसांना लसीकरण झाले. नंतर सर्वसामान्यांना लसीकरण सुरू झाले. सुरवातीस लशींचा साठा उपलब्ध नसल्याचे लसीकरणाला हवी तशी गती आली नाही. ऑनलाइन, ऑफलाइन नोंदणीचा घोळ सुरू झाला. मात्र लसच उपलब्ध नसतील तर काय? यामुळे केंद्र शासनाने राज्याला लशींचा पुरवठा सुरळीत करण्यास सुरवात केली. यामुळेच मागील महिन्यात एक लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण झाले. या महिन्यात मात्र लस कमी उपलब्ध झाल्या अन् नागरिकांनीही लसीकरणाकडे पाठ फिरविल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. विशेष म्हणजे ‘मिशन कवचकुंडल’अंतर्गत सर्वाधिक लसीकरण होणे अपेक्षित होते. त्यासाठी संबंधित यंत्रणांनी पुढाकार घेतला नसल्याचे चित्र आहे. यामुळे लसीकरणाला गती आलेली नाही.


आकडे बोलतात...

आतापर्यंत लस घेतलेले नागरिक असे
पहिला डोस घेतलेले - १९ लाख ८२ हजार १४१
दुसरा डोस घेतलेले - सहा लाख ४८ हजार ६०६
एकूण - २६ लाख ३० हजार ७४३
अपेक्षित लसीकरण (१८ वर्षांवरील) - ३४ लाख


कवचकुंडले मोहिमेत
पहिला डोस घेतलेले - ९३ हजार ५८
दुसरा डोस घेतलेले - ३१ हजार २५
एकूण - एक लाख २३ हजार ११५

लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना पुढाकार घेऊन लसीकरण करवून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुकानदार, विक्रेते, प्रतिष्ठाने यांच्यातील कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे आवाहन केले आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
-डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT