firecrackers diwali 
जळगाव

विदेशातून अनधिकृतपणे फटाक्‍यांची आयात; ते फोडले तर दंड

देविदास वाणी

जळगाव : विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले, स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाक्यांना बंदी करण्यात आली आहे. असे फटाके जवळ बाळगणे, त्यांचा साठा करणे, त्यांची विक्री करणे कायद्यानुसार अवैध आणि दंडनीय असल्याचे जिल्हादंडाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले. 

दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेल्या फटाक्यांची साठवणूक व विक्रीस प्रतिबंध करण्याकरिता फटाके विक्री करण्यासाठी परवानगी देणा-या सर्व यंत्रणांनी करावयाच्‍या कार्यवाहीबाबत सुसूत्रता आणण्यासाठी व उपाययोजनांसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. 

पोलिसांना कळविण्याचे आवाहन 
विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले, स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जवळ बाळगणे, त्यांचा साठा करणे आणि त्यांची विक्री करणे कायद्यानुसार अवैध आणि दंडनीय असल्यामुळे विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले, स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जर कोणी जवळ बाळगत असेल, त्याचा साठा करत असेल किंवा त्यांची विक्री करत असेल. अशी बाब नागरिकांच्या निदर्शनास आल्यास त्यांनी स्वयंप्रेरणेने त्यांच्या क्षेत्रातील नजीकच्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करावी. असे आवाहन जिल्हादंडाधिकारी राऊत यांनी केले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT