Dry-Fruitse 
जळगाव

अफगाणिस्तानातून आयात बंद..सुकामेवा, मसाले पदार्थाच्या दरात वाढ

सुकामेवा ऑस्ट्रेलियावरूनही भारताला आयात करता येणार आहे. मात्र, अफगाणिस्तानने निर्बंध घातल्याने भारतात सुक्यामेव्याच्या दरात वाढ झाली आहे.

देविदास वाणी

अफगाणिस्तानातून नवी दिल्लीत सुकामेवा, मसाल्यांच्या हबमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होते. तेथून भारतातील सर्व राज्यांत सुकामेवा, मसाले रवाना होतात.


जळगाव ः अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानने (Taliban) सत्ता हाती घेतल्यानंतर तेथून निर्यात होणाऱ्या विविध वस्तूंवर निर्बंध लावले आहेत. याचा परिणाम भारत (Indian) व अफगाणिस्तानातील व्यापारावर (Trade) झाला आहे. अफगाणिस्तानातून भारतात येणारा सुकामेवा (Dry-Fruitse), मसाले (Spices) पदार्थांची आवक बंद झाली आहे. परिणामी, सुक्यामेव्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.


कोरोना काळात सुक्यामेव्याच्या किमतीत घसरण झाली होती. यामुळे अनेकांनी इम्युनिटी वाढविण्यासाठी सुक्यामेव्याचा उपयोग केला. सहाशे ते सातशे रुपये किलोने बदाम, काजू उपलब्ध होते. मागील दिवाळीत अनेकांनी गिफ्ट बॉक्स म्हणून काजू, बदामाचा वापर केला. आता अफगाणिस्तान तालिबानने हाती घेतल्यानंतर भारतात निर्यात होणारे सुकामेवा, मसाल्यांवर निर्बंध घातले आहेत. अफगाणिस्तानातून नवी दिल्लीत सुकामेवा, मसाल्यांच्या हबमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होते. तेथून भारतातील सर्व राज्यांत सुकामेवा, मसाले रवाना होतात. आता नवी दिल्लीतच सुकामेवा, मसाले येत नसल्याचे चित्र आहे

Dry-Fruits


सुक्यामेव्याचे दर असे...
प्रकार-- पूर्वीचे दर--आताचे दर (प्रतिकिलो)
बदाम-- ७००-- ११००
काजू-- ६५०-- १००
खारीक-- १५०-- २००
पिश्ता-- ७००-- १२००



ऑस्ट्रेलिया असू शकतो पर्याय
सुकामेवा ऑस्ट्रेलियावरूनही भारताला आयात करता येणार आहे. मात्र, अफगाणिस्तानने निर्बंध घातल्याने भारतात सुक्यामेव्याच्या दरात वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलिया या परिस्थितीचा फायदा घेऊन सुक्यामेव्याच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियातून आता लागलीच सुकामेवा आयात करता येणार नाही. मात्र, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात तेथे सुक्यामेव्याची नवीन उत्पादने येतील. तेव्हा त्याची भारतात आयात करता येऊ शकते, अशी माहिती दाणाबाजार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

Chhatrapati Sambhajnagar: दिवसभर उकाडा; सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी; विजांच्या कडकडाटासह शहरभर पावसाचे आगमन

Shaktipith Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गाचा नकाशा बदलला, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिरोळ, हातकणंगले वगळले

Pune Rain News: पुण्याला गारांच्या पावसाचा तडाखा; मध्यवर्ती भागासह उपनगरांत नागरिकांची तारांबळ, झाडपडीच्‍या आठ घटना!

Chhatrapati Sambhajinagar: त्याने भरले बेरंगी आयुष्यात रंग!; ऑटिझमवर मात करीत स्वराज राजपूत बनला आईचा आधार

SCROLL FOR NEXT