जळगाव

पावसामुळे शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात व्यत्यय !

देविदास वाणी

जळगाव  ः शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामात पावसामुळे व्यत्यय येत आहे. कोरोना संसर्गामुळे महामार्गाच्या कामावरील कर्मचारी त्यांच्या गावी परत गेले होते. ते माघारी आल्यानंतर कामास वेग आला होता. मात्र संततधार पावसाने कामाची गती कमी झाली आहे. अनेक कारणांमुळे काम रखडले असले तरी मार्च २०२१ च्या आत शहरातील चौपदरीकरणाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणातर्फे देण्यात आली. आकाशवाणी ते आय.टी.आय व खोटेनगर ते गुजराल पेट्रोलपंप अशा दोन ठिकाणी उड्डाण पुल असल्याने वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे. 

गतवर्षी शहरातील चौपदरीकरणाचे काम झांडू कंपनीने एप्रिलपासून सुरू केले. मे जून मध्ये अनेक ठिकाणी खोदकाम करून भराव टाकण्याचे काम झाले. नंतर झालेल्या अति पावसामुळे व्यत्यय आला पुन्हा डिसेंबरपासून कामास सुरुवात झाली. काही ठिकाणी महामार्गाला समांतर एकेरी मार्गाचे काम झाले. प्रभात कॉलनी, गुजराल पेट्रोल पंप, दादावाडीसमोर उड्डाण पुलासाठी मोऱ्या तयार करण्याचे कामे सुरू आहेत. कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन सुरू झाला. एप्रिल ते जूनपर्यंत कामगार त्यांच्या गावी परतले होते. यामुळे काम बंद होते. आता कामाने स्पीड घेतला तर पावसाचा व्यत्यय येत आहे. उड्डाण पुलासाठी बोगदे तयार करण्याचे काम वीस टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले. पुढील कामासाठी लागणारे मटेरिअल कामाच्या ठिकाणी एकत्र करण्यात आले आहे. पावसाची उघडीप मिळताच काम पुन्हा वेगात येईल. 


४०० विजेच्या खांबाचा अडथळा दूर होईना 
शहरातील चौपदरीकरणात चारशे ते साडेचारशे विजेचे खांब अडथळा ठरत आहेत. त्याबाबत विज कंपनीकडे अनेक वेळा पत्र व्यवहारही झाला. मात्र अद्यापही विजेच खांबे, डीपी काढण्यात आलेल्या नाही. ते खांब काढले गेले तर त्याठिकाणी कामास गती देण्यात येणार आहे. 

किमान खड्डे बुजवावेत 
सततच्या पावसाने महामार्गासह बायपास मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहे. महामार्ग प्राधिकरणाचे संबंधित कंत्राटदारास किमान खड्डे बुजविण्याचे आदेश द्यावेत, जेणे करून वाहनांना अपघात होणार नाही. अशी मागणी वाहनधारकांची आहे. 
 

सपांदन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! तुमचा तालुका आहे का चेक करा... जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर

वानर थेट वाइन शॉपमध्ये घुसला; दारू प्यायली अन् पुढे जे घडलं ते पाहून लोकंही थक्क

Latest Marathi News Live Update : लालबागच्या राजाचं 24 तासांनंतर विसर्जन, भाविकांचे पाणावले डोळे; समुद्रकिनारी मोठी गर्दी

तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

SCROLL FOR NEXT