जळगाव

जिल्ह्यात कोरोना बाधित आठ रुग्णांचा बळी ;  जळगावात नवे ९४ रुग्ण

सचिन जोशी

जळगाव  : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग, तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढतेच आहे. मंगळवारी प्राप्त अहवालांत २२६ नवे बाधित रुग्ण आढळून आले, तर आठ जणांचा दिवसभरात मृत्यू झाला. एकट्या जळगाव शहरात ९४ रुग्ण आढळले. दुसरीकडे १४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. 

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असून, आठवडाभरापासून दररोज त्यात दोनशे रुग्णांची भर पडतेय. मंगळवारी नियमित चाचण्यांमधून १८२ व रॅपिड अँटिजेन टेस्टद्वारे ४४ रुग्ण आढळून आले. शिवाय, जळगाव शहरातील तीन जणांसह जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू झाला. सर्व रुग्ण ५० वर्षांवरील वयाचे होते. 

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर ९४, जळगाव ग्रामीण २८, भुसावळ १०, अमळनेर २१, चोपडा २४, पाचोरा २, भडगाव ६, धरणगाव ३, यावल २, एरंडोल ५, जामनेर २५, पारोळा ३, चाळीसगाव १, बोदवड १. 

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या सहा हजार ३९३ एवढी झाली असून, मंगळवारी (ता. १४) दिवसभरात १४७ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांची संख्याही तीन हजार ८८७ वर पोचली आहे. आतापर्यंत ३४३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. 

एरंडोलमध्ये दोन नगरसेविका बाधित 
एरंडोल : तालुक्यात २३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, रुग्णसंख्या ३०४ वर पोचली आहे. अहवालात दोन विद्यमान नगरसेविकांसह माजी नगरसेवक बाधित असल्याचे आढळले. सोमवारी १६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, तालुक्यात १७९ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. 

धरणगाव तीनशेच्या उंबरठ्यावर 
धरणगाव : शहरासह तालुक्यात कोरोना झपाट्याने पसरतो असून, रुग्णसंख्या २८२ झाली आहे. यात शहरी भागात १५२, तर ग्रामीण भागात १३० रुग्ण आहेत. दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. धरणगाव तालुक्यातील कोविड केअर सेंटरमधील व्यवस्था पाहून धरणगाव पॅटर्न जिल्ह्यात राबविला जावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. 

पहूरमध्ये ‘जनता कर्फ्यू’ 
पहूर (ता. जामनेर) : येथे ग्रामीण रुग्णालयातील स्विपर बॉयच्या संपर्कातील तीन, तर अंगणवाडीसेविकेच्या कुटुंबातील दोन जणांना संसर्ग झाला आहे. गावात बुधवार (ता. १४)पर्यंत ‘जनता कर्फ्यू’ आहे. 

फैजपूरमध्ये जनता कर्फ्यूला प्रतिसाद 
फैजपूर : शहरात मंगळवारी ‘जनता कर्फ्यू’ला नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला. सकाळपासून सायंकाळपर्यंत सर्वच रस्ते सामसूम होते. पालिका कर्मचारी ठिकठिकाणी तैनात असल्याने विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर चांगलाच वचक बसला आहे. 

यावलमध्ये लोकसहभागातून ऑक्सिजन सुविधा 
यावल : तालुक्यात लोकसहभागातून यावल ग्रामीण रुग्णालय व न्हावी ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी प्रत्येकी ३० खाटांचे नियोजन करण्यात येत असून, त्यासाठी लोकसहभागातून ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून व्यापारी व नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. व्यापारी असोसिएशनमार्फत मंगळवारी शहरात व्यापारी वर्गाकडून मदत गोळा करण्यासाठी फेरी निघाली होती. येथे तहसील कार्यालयात प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली. त्यात व्यापारी असोसिएशन व नागरिकांनी उपस्थिती दिली. या वेळी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष व डांभुर्णी ग्रामपंचायतीचे सरपंच पुरुजित चौधरी यांनी या कामासाठी सरपंच परिषदेकडून दीड लाखाची मदत जाहीर केली. 

कोरोनाने शिक्षकाचा मृत्यू 
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यातील धामणगाव व खेडगाव येथे कोरोनाने शिरकाव केला तर मूळ कळमडू येथील पण सध्या चाळीसगाव येथे राहत असलेल्या शिक्षकाचा जळगावात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोन्ही घटनांनी तालुका पुन्हा हादरला आहे. संबंधित दोन्ही गावांमध्ये बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन करून तेथील परिसर सॅनिटाइझ करून सील करण्यात आला आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navgaon ZP School: गरीब विद्यार्थ्यांची शाळा झाली नरकयात्रा... शौचालय बंद, इमारत ढासळलेली, मुंबईजवळ ही परिस्थिती तर...?

Latest Marathi News Updates : नंदुरबारमध्ये येणाऱ्या निवडणुकीत मतदान न करण्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये मुसळधार! 'पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मुत्यू'; कामावरून घरी येत हाेता अन्..

कुख्यात गुंडाचा खून करून नातेवाईकांना भेटण्यासाठी बीअर बारमध्ये बसले, कोल्हापूर पोलिसांवर गेम करणाऱ्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम

Asia Cup 2025 Super Four Scenario: भारतीय संघ पात्र, पाकिस्तानची बहिष्कारची धमकी; मग, उर्वरित ३ संघ कसे ठरणार?

SCROLL FOR NEXT