जळगाव

नोंदणी न झालेल्या दस्तावरील ‘नोंदणी फी’च्या दंडात मिळणार सूट

दंडाचा भरणा करून दस्त नोंदणी केली असल्यास दंडाचा परतावा मिळणार नाही

देविदास वाणी



जळगाव : एप्रिल व मे महिन्यात लॉकडाउन असल्यामुळे नोंदणी न झालेल्या दस्तावरील नोंदणी फीच्या दंडात सूट देण्याचे शासनाने निश्चित केले आहे. डिसेंबरमध्ये शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्क सवलतीमुळे स्वाक्षरी व अंगठ्याचे ठसे दस्तावर पूर्ण झाले; परंतु लॉकडाउनमुळे एप्रिल-मे या महिन्यांमध्ये नोंदणी न झालेली हस्तांतर व विक्री करारनामा या दस्तावरील नोंदणी फीच्या दस्तांमध्ये प्रथम दोन महिन्यांसाठी, जानेवारी २०२१ मध्ये निष्पादित झालेले परंतु नोंदणी न झालेले दस्त व अशा दस्तांवरील नोंदणी फीचा दंड जो नोंदणी फी रकमेच्या कमीत कमी २.५ पट व जास्तीत जास्त १० पट इतका आहे, तो कमी करून शासनाने एक हजार रुपये इतका निश्‍चित केला आहे. (exemption from penalty for registration fee on unregistered documents)

या कालावधीत यापूर्वी दंडाचा भरणा करून दस्त नोंदणी केली असल्यास दंडाचा परतावा मिळणार नाही, असे महसूल व वन विभागाचे सहसचिव श्रीधर डुबे पाटील यांनी काल जारी केलेल्या शासकीय परिपत्रकात म्हटले आहे.

आज कार्यालय उघडे
आज (ता. २६) फक्त अशाच प्रकारचे दस्त नोंदणीसाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये उघडी ठेवण्यात येणार आहेत. संबंधितांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी विजय भालेराव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT