जळगाव

राज्यातील पहिला प्रयोग...कोरोना बाधीतासाठी आता बेड साइड असिस्टंट, कुठे ? वाचा सविस्तर !

देविदास वाणी

जळगाव ः जिल्हा कोविड रुग्णालयात कोराेना बाधीत व्यक्तीची अधिक काळजी घेण्यासाठी रुग्णासोबत रुग्णालयात राहून सेवा शकणार आहेत. आता बाधीत रुग्णांच्या नातेवाइकांपैकी एकाला ही संधी बेड साईड असिस्टंट म्हणून देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घेतला आहे. कोविड रुग्णालयात बेड साईड असिस्टंट नेमण्याचा राज्यातील हा पहिला प्रयोग आहे. 

जिल्हा कोविड रुग्णालयात एका वृद्ध महिला रुग्णाचा मृतदेह तब्बल सहा दिवसांनंतर मृतदेह शौचालयात आढळून आला होता. याप्रकरणी तत्कालीन डीनसह काही डॉक्टरांवर निलंबनांची कारवाई झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. या रुग्ण महिलेला स्वतः चालता येत नव्हते. तिच्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी कोणी असते तर कदाचित ती महिला शौचालयातून परत येऊन उपचारानंतर बरी झाली असती. रुग्णालयात डॉक्टर व नर्सशिवाय कोणी मदतीला नसते. यावर उपाय म्हणून नूतन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ‘बेड साईड असिस्टंट’ हे पद निर्माण केले. स्वयंसेवकांनी पुढे येऊन त्याला प्रतिसाद दिला आहे. 

कोरोना बाधीत रुग्णांना भरती केल्यानंतर त्यांना चहा, नाश्‍ता पाणी देणे, शौचालयात घेऊन जाणे, औषधपाणी वेळेवर देण्यासह इतर सुविधा देण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गेल्या महिन्यात बेड साईड असिस्टंटच्या नेमणुका कोरोना वॉर्डात केल्या. आत्तापर्यंत जिल्हा कोविड रुग्णालयात ३० जण बेड साईड असिस्टंट म्हणून कार्यरत आहे. यामुळे जिल्हा कोविड रुग्णालयातील रुग्णांकडे अधिक लक्ष दिले जात आहे. अनेक रुग्ण बरे होत आहेत. 

रुग्णालयात जर रुग्णांची वरील प्रकारची काळजी घेणारी व्यक्ती असेल तर ती लवकर बरी होते असा आजपर्यंतचा अनुभव आहे. यामुळेच जिल्हाधिकारी राऊत यांनी आता बाधीत रुग्णांच्या नातेवाइकांपैकी एकाला रुग्ण असे पर्यंत ‘बेड साईड असिस्टंट’ म्हणून नेमण्याचा निर्णय घेतला आहे. 


बाधीत रुग्णांचा एक नातेवाईक बेड साईड असिस्टंट म्हणून त्यासोबत रुग्णालयात राहू शकतो. त्याअगोदर त्यांना ‘डीन’कडे नोंदणी करून संमतिपत्र द्यावे लागेल. संबंधितांना पीपीइ कीट इतर संरक्षणाची साहित्य दिले जातात. संबंधिताच्या नातेवाइकास वेळ पडली तर मानधनही देऊ मात्र त्यांनी इतर रुग्णांचीही काळजी घेतली पाहिजे. 

जिल्हाधिकारी अभिजित राऊत. 

संपादन- भूषण श्रीखंडे,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

SCROLL FOR NEXT