जळगाव

पाचही नगरसेवक म्हणतात, आमच्याकडे ‘ते’ दस्तऐवज नाहीत ! 

रईस शेख


जळगाव : येथील बहुचर्चित घरकुल घोटाळ्यात शिक्षा झालेल्या विद्यमान पाच नगरसेवकांना अपात्र करण्यासंदर्भात १६ मार्च २०२० ला न्यायालयात विशेष दावा दाखल करण्यात आला आहे. पाचही नगरसेवक गुरुवारी (ता. १२) जिल्‍हा न्यायालयात कामकाजासाठी हजर राहिले होते. तक्रारीसंदर्भातील दस्तऐवज मिळावेत, वकील लावण्यासाठी मुदतवाढ मिळावी म्हणून या नगरसेवकांनी विनंती केली. पुढील कामकाजासाठी न्यायालयाने २३ नोव्हेंबरची तारीख दिली आहे.


घरकुल घोटाळ्यात आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसह ४८ जणांना धुळे विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. यामध्ये भगत बालाणी, सदाशिव ढेकळे, दत्तात्रय कोळी, लता भोईटे व कैलास सोनवणे या पाच नगरसेवकांचा समावेश आहे. दरम्यान, पाचही नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी लावून धरली होती. मंत्रालयापर्यंत तक्रारी केल्यानंतर प्रकरण न्यायालयात पोचले. मात्र ते सभागृह सदस्य नसल्याने त्यांच्याऐवजी शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी १६ मार्चला दावा दाखल केला. लॉकडाउनमुळे कामकाज होऊ शकले नाही. न्यायालयाने या सर्व नगरसेवकांना गुरुवारी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पाचही नगरसेवक न्यायालयात उपस्थित होते.

पुढील कामकाज १३ डिसेंबरला

आमच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या दाव्याचे मूळ दस्तऐवज मिळावेत, आम्हाला वकील लावण्यासाठी मुदत मिळावी, अशी विनंती करण्यात आली. त्यावर तक्रार पक्षाचे वकील ॲड. सुधीर कुळकर्णी यांनी आक्षेप घेत ज्या खटल्याच्या निकालाविरोधात आपण उच्च न्यायालयातून जामीन मिळविला, त्याचे दस्तऐवज आपणाकडे नाहीत. नगरसेवकांच्या अर्जावर कामकाज होऊन न्या. जे. जी. पवार यांच्या न्यायालयाने पुढील कामकाजासाठी १३ डिसेंबर तारीख दिली आहे.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT