जळगाव

शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काढलेल्या दिंडीला आज ३९ वर्ष पूर्ण !

कैलास शिंदे

जळगाव ः माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शेती व शेतकऱ्यांविषयी असलेली तळमळ सर्वश्रृत असून त्यांनी १९८० मध्ये जळगाव ते नागपुर अशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पायी दिंडी काढली होती. या दिंडीला आज ३९ वर्ष पूर्ण होत असून शेतकऱया विषयी त्यांच आज ही तळमळ दिसून येत असून दिल्ली येथील सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला त्यांनी पांठिबा दर्शवून ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शिष्टमंडळासह भेटणार आहे.  

आवश्य वाचा- राज्यात २१३ लाख टन उसाचे गाळप; खानदेशात प्रारंभ -

सात डिसेंबर १९८० रोजी शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जळगाव ते नागपुर अशा शेतकरी पायी दिंडीचे आयोजन केले होते. जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या मैदानावरून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले होते. या शरद पवारांनी काढलेल्या या दिंडीमूळे त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. 

विरोधकांना आणले एकत्र 
शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शरद पवारांनी या आंदोलनात विरोधकांना एकत्र आणले होते. यात दिग्गज नेत ग. प्र. प्रधान, बाब आढाव, शिवाजीराव देशमुख, एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, एस. एम. जोशी, राजारामबापू पाटील, प्रतिमा दंडवते, नानासाहेब गोरे, बापूसाहेब काळदाते, जॅार्ज फर्नांडीस, मृणाल गोरे, गोविंदराव आदिक, ए. बी. वर्धन, अरुण मेहता, शिवाजीराव  गिरधर पाटील, सुरेश कलवाडी हे नेते सहभागी झाले होते. 

पवनेपाचशे किलोमीटर पायी प्रवास
शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत जळगाव शहरातून निघालेली पायी दिंडी नागपुरला पवनेपाचशे किलोमीटरचे पायी प्रवास करून पोहचली. त्यावेळीचे अंतुले सरकारने दिंडीत सहभागी होण्यासाठी गेलेले यशवंतराव चव्हाण यांना अटक केली होती. या आंदोलनामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला होता. त्यानंतर या आंदोलनाची प्रेरणा घेत दिल्ली येथे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले होते. 

सिनेकलकरांचा देखील मिळाला होता पाठिंबा
शरद पवारांनी केलेल्या आंदोलनास त्यावेळच्या सिनेकलाकारांनी देखील शेतकरी आंदोलन पाठिंबा दिला होता. यात दिलीपकुमार, जब्बार पटेल, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू ही मंडळी दिंडीत सहभाग घेण्यास नागपुरला निघाले असता शरद पवारांनी त्यांना न येण्याचा निरोप दिला होता.    

शरद पवार राष्ट्रपतींनी भेटणार
सद्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दिल्ली येथे पंजाब व हरियाणाच्या शेतकऱयांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला शरद पवारांनी पांठिबा दिला असून ते शिष्टमंडळासह ९ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहे.  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: साखर झोपेत असताना भयंकर घडलं! ठाण्यात २५ वर्षे जुन्या सदनिकेचा काही भाग कोसळून दुर्घटना; २ जखमी

Pune Crop Insurance: पुणे जिल्ह्यात सुमारे ८३,००० शेतकऱ्यांनी काढला पीक विमा; २३८ कोटी रुपयांचे मिळणार पीक विमा सुरक्षा कवच

‘मला वाटलं मी मरणारच…’ कॅन्सरच्या निदानानंतरची ती भयानक रात्र सांगताना मनीषा कोईराला भावुक, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : चाकणमध्ये ५ ते ७ किमी वाहनांच्या लांबच लांब रांगा! खड्ड्यांमुळे चाकण महामार्गावर अपघात; २ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे गंभीर

पुण्यातील बुधवार पेठेत सपना बिल्डिंगमध्ये पोलिसांचा छापा... समोर जे दिसलं ते धक्कादायक, २ जणांना अटक

SCROLL FOR NEXT