friend photo in wife mobile 
जळगाव

मोबाईलमध्ये मित्राचा फोटो; पतीने पत्‍नीसोबत केले हे कृत्‍य

रईस शेख

जळगाव : महाविद्यालयीन मित्रासोबतचा फोटो मोबाईलमध्ये आढळून आल्याने संशयी पतीने मोठ्या भावाच्या मदतीने पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीला मारहाण करून तिचा गळा दाबून उशिने नाकतोंड दाबत ठार करण्याचा प्रयत्न केला. मरणासन्न अवस्थेत असलेल्या विवाहितेवर चार दिवसांपासून उपचार सुरू असून, तिने दिलेल्या जबाबावरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. 
तहसील कार्यालातील रेशन विभागात कंत्राटी पद्धतीवर कार्यरत योगेश जोशी याच्या सोबत गेल्या वर्षीच १० फेब्रुवारीला स्वाती यांचा विवाह झाला. लग्नानंतर जेठ प्रदीप जोशी खेाटेनाटे सांगत पती-पत्नीत भांडणे लावत असल्याने एकत्र कुटुंबात वाद होत असल्याने स्वाती आणि योगेश यांनी महाबळ कॉलनीत भाडेतत्त्वावर घर घेऊन ते तेथे वास्तव्यास आहेत. वेगळे राहत असतानाही सासरच्या मंडळींचा त्रास कमी झाला नसून पतीसह जेठाने ठार करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

मोबाईलमधील फोटोमुळे वाद 
पती योगेश जोशी याने स्वातीचा मोबाईल तपासला असता त्यात स्वातीचे मित्रासोबतचे फोटो आढळले. त्यावरून वादाला सुरवात झाली. मंगळवारी (ता. ८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पती योगेश व जेठ प्रदीप यांनी लाथाबुक्क्यांनी स्वातीला बेदम मारहाण केली. मारहाण करताना गळा दाबल्यानंतर तोंडावर उशी ठेवून श्‍वाससोच्छवास बंद होईपर्यंत मारहाण केली. स्वाती बेशुद्ध पडल्याने तिला सेाडून दिल्यावर तिने घरातून पळून शेजाऱ्यांकडे आसरा घेतला. तेथेही पती व जेठाने धाव घेत स्वातीला उचलून आणत असताना आरडाओरड केल्याने देाघांनी तिला सोडून पळ काढला. 

रुग्णालयात दाखल 
शेजारच्या महिलेच्या मोबाईलवरून स्वातीने मामा माणिक जोशी यांना कळवले. कुटुंबीयांनी तत्काळ धाव घेत स्वातीला खासगी रुग्णालयात दाखल केले. चार दिवसांपासून बेशुद्धावस्थेत तिच्यावर उपचार सुरू असल्याने पोलिस जबाब नोंदवू शकले नाही. आज स्वाती शुद्धीवर आल्यानंतर घटनेची इत्यंभूत माहिती पोलिसांना दिल्यावरून पती योगेश जोशी, जेठ प्रदीप जोशी अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.  

संपादन ः राजेश सोनवणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : नागपूर पोलीस आयुक्त नांगरे-पाटलांना काँग्रेसनं भेट दिली संविधानाची प्रत

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT