जळगाव : कोरोना संसर्गामुळे शासनाच्या आदेशामुळे गणेश मंडळांना गणेशाची स्वागत व विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही. सोबतच ढोल, ताशे, वाजंत्रीही लावता येणार नाही. आरतीला केवळ पाचच जणांना उपस्थित राहता येईल. मूर्ती चार फूट उंचीचीच असावी. आरोग्य विषयक उपक्रम राबवावेत अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज येथे केल्या.
जिल्हा प्रशासनाने आज शहरातील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. त्यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर जिल्हाधिकारी प्रविण पाटील, महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी यासह सर्व प्रांताधिकारी, पोलिस उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक, गणेश मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राउत म्हणाले, गणेशोत्सवात समाज प्रबोधनपर देखावे करा. भावीकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्या. मुर्ती चार फुट उंचीचीच बसवा. आरोग्य विषयक जनजागृती करा. देखावे, रोषणाईवर अधिक खर्च करण्यापेक्षा जिल्हा प्रशासनाला अत्यावश्यक साहित्य घेण्यासाठी गणेश मंडळांनी भर द्यावा. गणेश विसर्जनाच्या दिवशी गणेश मंडळांनी त्यांच्या परिसरातील घरगुती गणपती मुतीर् एकत्र करून त्या विसर्जनासाठी न्याव्यात, जेणे करून मेहरूण तलावावर गदी होणार नाही. जिल्हा प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून गणेश मंडळांनी काम करा.
खड्डे बुजविण्याची मागणी
शहरात अनेक ठिकाणी रस्ते खड्डेमय झाले आहे. मूर्ती आणताना खड्ड्यातून वाहने गेल्यास वाद होतात. यामुळे महापालिकेने शहरातील सर्व रस्ते चांगले करावेत. अनेक भागात पथदिवे नाहीत ते लावावेत. गणेश मंडळांना विविध परवानग्या त्वरित मिळण्याची व्यवस्था करावी, शहरात स्वच्छता ठेवा आदी मागण्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या. यावेळी पोलिस अधिक्षक डॉ.उगले, आयुक्त कुलकर्णी यांनीही मागर्दर्शन केले.
संपादन ः राजेश सोनवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.