Ganesh Visarjan
Ganesh Visarjan 
जळगाव

जळगावात ‘श्रीं’च्या विर्सजन स्थळावर ‘ड्रोन’ची राहणार नजर

देविदास वाणी



जळगाव ः जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग(Disaster Management Department), वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र आणि जीवरक्षक शोध व बचाव पथक(Wildlife Conservation Society Squad), निर्माल्य संकलनासाठी श्रीसेवक असे ४० सभासद जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या सूचनेनूसार मेहरुण तलावावर गणेशमूर्ती विसर्जनासाठी (Ganesh Visarjan) राहणार आहेत. उद्या रविवारी (ता. १९) आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येणार असल्याने विसर्जनासाठी आलेल्या भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून तयारीला वेग देण्यात आला आहे.



हे पथक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ यांच्या नेतृत्वात १९ सप्टेंबरला पूर्णवेळ कार्यरत राहणार आहे. शोध व बचाव पथकास जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे बोट उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यात दहा पट्टीचे पोहणारे प्रशिक्षित जीवरक्षक तैनात राहणार आहेत. तर अमन गुजर हे ड्रोनद्वारे परिसरात सतत पाहणी करतील, असे संस्था सचिव योगेश गालफाडे, बाळकृष्ण देवरे यांनी सांगितले. मेहरुण तलावात विसर्जनादरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये, या अनुषंगाने दरवर्षी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शोध व बचाव पथक तैनात केले जात असते.

...असे राहील नियोजन
जीवरक्षक पथक : नरवीरसिंह रावळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, योगेश गालफाडे, ऋषी राजपूत, शीतल शिरसाळे, अजीम काझी, बबलू शिंदे, राजेश सोनवणे, सतीश कांबळे, रितेश भोई, चेतन भावसार, रवींद्र फालक, मनपा अग्निशमन विभाग जीवरक्षक पथकदेखील तैनात आहेच. वरील सर्व जीवरक्षक सकाळपासून रात्री विसर्जन पूर्ण होईपर्यंत बोट घेऊन गस्त घालत नागरिकांना सूचना देतील.


या परिसरात साप, विंचू यांचा अधिवास असल्याने अचानक सर्प दृष्टीस पडल्यास नागरिक घाबरून धावपळ करतात यावर पर्याय म्हणून वन्यजीव संरक्षण संस्थेचे दहा सर्पमित्र तैनात राहणार आहेत. आपत्कालीन क्रमांक ७७०९७७६४४६, ९०२८३०८३६५

सर्पमित्र पथक
जिल्हा मानद वन्यजीव रक्षक, वनविभाग महाराष्ट्र राज्य रवींद्र फालक यांच्या नेतृत्वात
जगदीश बैरागी, अभिषेक ठाकूर, सुरेंद्र नारखेडे, नीलेश ढाके, शुभम पवार, दुर्गेश आंबेकर, दिनेश कोळी, बापू कोळी, किरण सपकाळे, वासुदेव वाढे, गणेश सोनवणे हे असतील.

निर्माल्य संकलन श्रीसेवक
तलावात निर्माल्य जाऊ नये, तसेच लहान मुले काठावर जाऊ नये यासाठी २० सभासद राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात निर्माल्य संकलनासाठी तैनात राहणार आहेत. या पथकात प्रसाद सोनवणे, अरुण सपकाळे, जितेंद्र सोनवणे, भूषण चौधरी, गणेश सपकाळे, प्रदीप शेळके, विनोद सोनवणे, रवींद्र भोई, ललित शिरसाठे, तुषार रंध्ये, भूपेंद्र तळेले, गौरव शिंदे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

गिरणा पंपिंगवर विसर्जनास बंदी
जळगाव महापालिका प्रभाग समिती क्रमांक चारच्या हद्दीतील
सावखेडा शिवार गिरणा पंपिंग स्टेशन नदीपात्रात श्रीगणेश विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सावखेडा शिवारातील गिरणा पंपिंग स्टेशन येथे धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे. मागील चार-पाच वर्षांपासून या ठिकाणी श्री गणपती विसर्जनास प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली होती. आजदेखील सदर भागात तशीच धोकादायक परिस्थिती असल्याने यावर्षीसुद्धा या ठिकाणी श्रीगणेश विसर्जनास बंदी आहे, असे महापालिकेने सांगितले आहे. निमखेडी परिसरातही बंदी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT