Girna dam Girna dam
जळगाव

गिरणा धरणातून सोमवारी आवर्तन सुटणार; १५८ गावांना दिलासा

गिरणा पाटबंधारे विभागाकडे आवर्तन सोडण्याची मागणी केली होती

सुधाकर पाटील


भडगाव : पाणी टंचाईची (Water scarcity) झळ सोसणाऱ्या गिरणा पट्ट्याची तहान भागविण्यासाठी सोमवारी (ता. ३१) सकाळी सात वाजता गिरणा धरणातून ( Girna dam) नदी पात्रात जिल्हाधिकाऱ्यांच्या (Collector) आदेशाने १ हजार ५०० क्युसेकने पाणी सोडण्यात येणार आहे, असे गिरणा पाटबंधारे विभागाचे ( Girna Irrigation Department) कार्यकारी अभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांनी सांगितले. त्यामुळे भडगाव, पाचोरा शहरासह १५८ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळणार आहे. मागचे आवर्तन (Rotation) ७ एप्रिलला सोडण्यात आले होते. धरणात सध्या ३८ टक्के एवढा पाणीसाठा आहे. (girna dam rotation from one hundred and fifty eight villages benefit)


गिरणा पट्ट्यात आवर्तनाअभावी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. पाचोरा व भडगाव शहरात टंचाई जाणवायला लागली होती. त्यापार्श्वभूमिवर भडगाव व पाचोरा नगरपरिषदांनी जिल्हाधिकारी, गिरणा पाटबंधारे विभागाकडे आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने गिरणा धरणातून सोमवारी सकाळी सात वाजता १५०० क्युसेकने पाणी सोडण्यात येणार आहे.

गिरणाकाठ झाला होता ‘कोरडाठाक’

गिरणा काठ हा कायम पाण्याच्या बाबतीत समृध्द म्हणून ओळखला जातो. मात्र हाच पाण्याने श्रीमंत असलेला पट्टा आता पाण्यासाठी कासाविस झाल्याचे पहावयास मिळत होते. गिरणा काठाच्या घशाला कोरड पडली होती. शहरासह ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे त्यावर अंवलबून असलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांच्या विहिरींनी तळ गाठायला सुरवात केली होती. त्यामुळे पाणीपुरवठा पुरता विस्कळीत व्हायला लागला होता. सद्य: स्थितीला धरणात सात हजार दशलक्ष घनफुट म्हणजेच ३८ टक्के एवढा जीवंत पाणीसाठा आहे. तर ३ हजार दशलक्ष घनफुट मृत जलसाठा आहे. आवर्तन सोडण्यात येणार असल्याने गिरणा काठाची टंचाई तूर्तास दुर होणार आहे. काठावरील गावांनी पाण्यात जाऊ नये, तर कृषीपंपाचा ही वापर करू नये असे आवाहन उपविभागीय अधिकारी हेमंत पाटील, शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी केले आहे.



सोमवारी सकाळी सात वाजता पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गिरणा धरणातून १ हजार ५०० क्युसेसकने पाणी सोडण्यात येणार आहे. या पाण्याचा कोणीही गैरवापर करून नये. पाणी जपून वापरावे, नदीपात्रात जाऊ नये.
- धर्मेंद्रकुमार बेहरे
कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभाग

धरणाची सद्यस्थीती

- धरणात असलेला पाणीसाठा
७००० दशलक्ष घनफुट (३८ टक्के)

- सोडण्यात येणारे पाणी
१४०० दशलक्ष घनफुट

- अवलंबून गावे
२ पालिका १५८ ग्रामीण पाणीपुरवठा योजना

-मागचे आवर्तन

७ एप्रिल सोडण्यात आले होते

- किती क्युसेस पाणी सोडणार

१५०० क्यसेक ने सुटणार पाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

Gen Z Fashion Trends 2026: आउटडेटेड झालेल्या वायर इअरफोनच्या प्रेमात Gen Z, फॅशनमध्ये का परतला रेट्रो टच?

SCROLL FOR NEXT