fir 
जळगाव

जळगावः चोवीस कोटींत सराफ व्यावसायिकाची फसवणूक

ज्या जमिनीबाबत कागदपत्र तयार केले होते. त्या जमिनीचा नाशिक न्यायालयात वाद सुरू आहे.

सकाळ वृ्त्तसेवा


जळगाव : उसनवारीने दिलेले २४ कोटी ६३ लाख १६ हजार रुपये परत न करता जळगावातील नामांकित सराफ व्यावसायिकाची (Gold businessman) फसवणूक (Cheating) झाली असून, पैसे परत करण्यासाठी बनावट ॲग्रीमेंट तयार केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिस (Shanipaeth Police) ठाण्यात नाशिक येथील अशोक बांधकाम व्यावसायिकासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नाशिकच्या अशोक बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स कंपनीचे मालक अशोक कटारिया आणि जैन यांचे अनेक वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत. कटारिया यांनी जैन यांना व्यवसाय करण्याची गरज सांगून २०१०-११ व २०१४-१५ दरम्यान वेळोवेळी ११ कोटी आणि १७ कोटी ६३ लाख ८० हजार २१० रुपये उसनवारीने घेतले. यातील काही रक्कम कटारिया यांनी परत केली. सहा कोटी ९९ लाख ३६ हजार ७४१ आणि १७ कोटी ६३ लाख ८० हजार २१० अशी एकूण २४ कोटी ६३ लाख १६ हजार ९५१ रुपये कटारिया यांच्याकडे बाकी होते. त्यानंतर २ ऑक्टोबर २०१५ ला कटारिया राजेंद्र चिंधुलाल बुरड, स्नेहल सतीश पारख ऊर्फ स्नेहल मंजीत खत्री यांना सोबत घेऊन सराफा बाजारातील कार्यालयात आले. त्यावेळी त्यांनी पैसे परत करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ मागितली. यासाठी कटारिया यांनी जैन यांना एक जॉइंट व्हेंचर ॲग्रीमेंट करून घेण्याचे सांगितले. त्या कागदपत्रांवर जैन यांनी सह्या केल्या. त्यानंतर मानराज मोटर्स यांना पैसे देण्याचे सांगून जैन यांनी पुन्हा कटारिया यांच्याकडे पैशांची मागणी केली. दरम्यान, कटारिया यांनी ज्या जमिनीबाबत कागदपत्र तयार केले होते. त्या जमिनीचा नाशिक न्यायालयात वाद सुरू आहे. त्याचा निकाल प्रलंबित आहे. त्या कागदपत्राच्या आधारे जैन यांची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर जैन यांनी शनिपेठ पोलिसांत धाव घेतली.

त्यांच्या फिर्यादीवरून नाशिकच्या अशोक बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स कंपनीचे मालक अशोक मोतीलाल कटारिया, राजेंद्र चिंधुलाल बुरड, स्नेहल सतीश पारख ऊर्फ स्नेहल मंजीत खत्री, आशिष अशोक कटारिया, सतीश धोंडूलाल पारख (सर्व रा. नाशिक) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक बळीराम हिरे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : : खरीप हंगामात डीएपी या रासायनिक खताची टंचाई; पावसामुळे मशागतीची कामे ठप्प

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT