groundwater-leveling-works
groundwater-leveling-works groundwater-leveling-works
जळगाव

‘पाणी अडवा पाणी जिरवा’च्या कामांना वेग !

देविदास वाणी

जळगाव ः डोंगर, नदी नाल्यांसह अन्य मोकळया ओसाड जागांवरून पावसाळ्याच्या (Rain) दिवसांत अतिरिक्त असणारे पाणी वाहून जाते. डोंगरपठारांवरील उतारांवर योग्य अंतरावर चर खोदून वा बांध बांधून तेथेच अडविल्या जमीनीतील झिरपल्याने पाण्याची पातळी उंचावण्यासाठी (Water level) मदत होउ शकते. या उद्देशाने शासन निर्देशानुसार (government) मोकळया ओसाड जागांवर डोंगर उतारावरासह तसेच अन्य जागी चर खोदकाम करणे, वृक्षारोपणासाठी खड्डे खोदकामे प्रशासकिय स्तरावरून केली जात आहेत. (groundwater leveling works accelerate)

एकीकडे ग्रामीण भागात खरीप पेरणीसाठी मान्सूनपूर्व (Monsoon) मशागतीच्या कामांना शेतकऱ्यांनाकडून गती दिली जात आहे. दुसरीकडे पाणी अडवा, पाणी जिरवासह अन्य शासनस्तरावरील योजनांच्या माध्यमातून डोंगर उतारावर वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी आडवे चर खोदकाम केले जात आहे. शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत वृक्ष लागवडीसाठी योग्य आकाराचे खड्डे खोदकाम सुरू करण्यात आले आहेत. जळगावपासून काही अंतरावर असलेल्या शिरसोली परीसरात डोंगर उतारावर मोकळया ओसाड जागी आडवे चर खोदकामांना वेग देण्यात आला आहे. यामुळे भूगर्भातील (groundwater leveling) पाणी पातळी उंचावण्यास मदत होणार असून या परीसरात सिंचीत रोपवन अंतर्गत रोपांची लागवड देखिल करण्यात येणार आहेत.

जळगाव वनपरीक्षेत्रांतर्गत शिरसोली लांडोरखोरी परिसरात पावसाळ्याच्या दिवसांत डोंगर उतारावरून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ अंतर्गत आडवे चरांचे खोदकाम केले जात आहे. महामार्गालगतच्या सुमारे १७ हेक्टर ओसाड माळरानावर
सिंचीत रोपवन योजनेंतर्गत खड्डे केले जात आहेत. रोपांच्या संवर्धन, मोकळया प्राण्यांपासून नुकसान होउ नये, यासाठी सुमारे २.५ ते ३ किलोमिटर लांबीचे तारेचे कुंपण देखिल करण्यात येत आहे.
- आर.जे. राणे. जळगाव वनपरिक्षेत्र अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Sharan Singh : आता मी खुला सांड... तिकीट नाकारलेल्या ब्रिजभूषणनं कोणाला दिलं आव्हान?

Bhushan Patil: "शिवरायांचा छावा" फेम अभिनेता भूषण पाटील करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; म्हणाला, "मी खूप उत्सुक आहे पण..."

Nashik News : मुंढेगावजवळ गोदान एक्सप्रेसच्या चाकाखालून धुर! प्रवाशांनी घाबरून मारल्या उड्या

Yogi Adityanath : पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांना भारतात थारा नाही : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT