Hatnur Dam 
जळगाव

हतनूर धरणाचे १४ दरवाजे उघडले,नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा

Hatnur Dam Alert News : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील चांगला पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

भूषण श्रीखंडे

धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेवून सकाळी सात वाजता १४ दरवाचे पूर्ण उघडण्यात आले असून तापी नदीपात्रात ३०० क्युसेक पाणी धरणातून सोडण्यात आले आहे.

जळगावः जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या (Hatnur Dam) मध्यप्रदेश (Madhya Pradesh) व विदर्भातील (Vidarbha) पाणलोट क्षेत्रात जोरदार झालेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढली आहे. गुरूवारी रात्री साडेदहाला आठ दरवाजे उघडण्यात आले तर आज सकाळी 7 वाजता धरणाचे 14 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले असून तापी नदीपात्रात 300 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा (Warning) इशारा दिला आहे.

जळगाव जिल्ह्यत गेल्या तिन दिवसांपासून सतत धार सुरू आहे. त्यात हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील चांगला पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेवून सकाळी सात वाजता १४ दरवाचे पूर्ण उघडण्यात आले आहे. तर तापी नदीपात्रात ३०० क्युसेक पाणी धरणातून सोडण्यात आल्याने तापी नदीला पूर आला आहे.

महिन्याभरापूर्वी पूर्ण दरवाजे उघडले

हतनुर धरणाचे मध्यप्रदेश व विर्दभात पाणलोट क्षेत्र असून महिन्याभरापूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्यावेळी हातनुर धरणाचे संपूर्ण ४१ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले होते. त्यावेळी तापी नदीला मोठा पूर आला होता.

नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हतनुर धरण क्षेत्रात आजून पाऊस सुरू असून धरणात आजून पाण्याचा प्रवाह येत आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून तापी नदीत धरणातून पाण्याचा मोठा विर्सग केला जात आहे. त्यामुळे तापी नदीला पुर येवू शकतो. तसेच नदी पात्रा लगत गावांमधील नागरिकांना इशारा कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांच्या तर्फे दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT