health
health 
जळगाव

रुग्णांनो घाबरू नका...कोणत्या आजारासाठी, कोठे सुविधा...माहिती मिळणार घरबसल्या 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कोणत्या आजारासाठी कोणत्या रुग्णालयात जावे, तेथे खाटाची उपलब्धता समजण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने बेडस ऍव्हेलेबिलीटी ऍण्ड मॅनेजमेंट सिस्टिम हि ऑनलाइन प्रणाली सुरू केली आहे. यासाठी https://findbeds.online नावाचे संकेतस्थळ व ऍड्रॉईड ऍप्लिकेशन सुरू केलेले आहे. याद्वारे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना आपल्या मोबाईल व संगणकावर घरबसल्या आवश्‍यक त्या आजाराचा उपचार करणेसाठी योग्य त्या रुग्णालयात बेड्‌स शिल्लक आहे अथवा नाही हे बघता येणार आहे. 

कोविड-19 आजाराशिवाय अन्य व्याधी/आजाराच्या रुग्णांच्या उपचार व सोयीकरीता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील 33 रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेव्दारे सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. या रुग्णालयाच्या नावांची यादी देखील उपलब्ध करुन दिलेली आहे. 

तरीही काही प्रसंगी अन्य आजाराच्या रुग्णांना याबाबत पुरेशी माहिती मिळत नसल्याने आरोग्य सुविधा उपलब्ध असलेल्या नेमक्‍या रुग्णालयात न जाता रुग्णांची इतरत्र म्हणजेच या रुग्णालयातुन दुस-या रुग्णालयात भटकंती होत असते. निश्‍चित कोणत्या आजार/व्याधीसाठी कोणत्या रुग्णालयात सुविधा उपलब्ध आहेत, तेथील बेड्‌स उपलब्धता व इतर तत्सम उपकरणांची उपलब्धता आदी माहितीच्या अभावामुळे रुग्णांचे हाल होतात. यावर उपायोजना म्हणून वरील प्रणाली विकसीत झाली आहे. 

याशिवाय हे संकेतस्थळ व ऍप हाताळणी बाबत काही अडचणी असल्यास जिल्हा परिषद मधील वॉर रुम कक्षास 0257-2224268 या संपर्क क्रमांक संपर्क करता येईल. संकेतस्थळ व ऍप विकसीत करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी विनोद गायकवाड व प्रशांत होले यांनी सहकार्य केले. आज या संकेतस्थळाचे उद्‌घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कोविड रुग्णांच्या सर्व्हेक्षणासाठीच्या व्हॅनचे उदघाटनही झाले. 
 
ही मिळणार माहिती.. 
या संकेतस्थळावर तालुकानिहाय रुग्णालयांचा माहिती घेऊन त्यात खाटा शिल्लक आहेत काय, त्यात खाटासमवेतच ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर व तत्सम सुविधा देखील रुग्णांना शोधता येणार आहेत. मोबाईल अँड्रॉईड अँप्लीकेशन www.zpjalgaon.gov.in व www.jalgaon.gov.in या वेबसाइटवरून तसेच गुगल प्ले स्टोर वरुन देखील डाऊनलोड करता येणार आहे. संकेतस्थळावर व मोबाईल ऍप्लिकेशन वर महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत पॅनलवरील व खासगी रुग्णालये यांचे वर्गीकरण, रुग्णालयाचा संपूर्ण पत्ता, दुरध्वनी क्रमांक, संपर्क व्यक्ती, आरोग्यदूत यांचे नाव व दुरध्वनी क्रमांक उपलब्ध होणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार

Game Of Thrones : 'गेम ऑफ थ्रोन्स' मधील 'या' कलाकाराचं निधन; "त्यांच्याशिवाय जगणं मुश्किल.." पार्टनरची पोस्ट चर्चेत

Sushma Andhare : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अंधारे करणार तक्रार; प्रचार सभेतील भाषणावर घेतला आक्षेप

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

IPL 2024 Points Table: 16 पाँइंट्स अन् केवळ तीनच पराभव, तरी कोलकाता-राजस्थानला अद्यापही का मिळालं नाही प्लेऑफचं तिकीट?

SCROLL FOR NEXT