जळगाव

कोरोना रुग्णांच्या शोधासाठी "आयटी'चा आधार...आरोग्यसेतू ऍपची मदत !

देवीदास वाणी

जळगाव  ः जिल्ह्यात बाधितांची वाढती संख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने "आयटी' विभागाची मदत घेतली आहे. "आरोग्यसेतू ऍप'द्वारे जिल्ह्यात मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून बाधित रुग्ण शोधण्याची मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे मोबाईल नेटवर्कद्वारे बाधित व्यक्ती कोणत्या व्यक्तीच्या किती वेळ संपर्कात होती, संबंधिताचा पत्ता, मोबाईल क्रमांकही उपलब्ध होत आहे. यामुळे बाधित रुग्णांची संपर्काची माहिती सहजरीत्या मिळवून संबंधितांवर उपचारासाठी आरोग्य विभागाला सतर्क केले जात आहे. 

दिल्ली येथून आयटी सिस्टिम कार्यान्वित होते. ते ब्लूटूथ प्रॉझिमिटीच्या माध्यमातून ज्यांनी आरोग्यसेतू ऍप डाउनलोड करून आपली माहिती भरली आहे त्यांना कोणता आजार आहे किंवा आजाराची लक्षणे आहेत यावर लक्ष ठेवते. ऍप डाउनलोड केलेल्या कोणीही जर पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले तर दिल्लीवरूनच मोबाईल टॉवरद्वारे बाधित व्यक्ती ऍपधारक संबंधिताच्या किती वेळ संपर्कात आली आहे, त्यावरून ऍपधारक व्यक्तीने क्वारंटाइन होणे, संस्थात्मक क्वारंटाइन होणे किंवा स्वॅब घेण्यास सांगते. त्यासोबतच मोबाईल, पत्ता, टॉवर एरिया, महिला आहे किंवा पुरुष, ती आणखी कोणाच्या संपर्कात आली आहे, अशी एकत्रित माहिती दिल्लीवरून जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील आयटी विभागात येते. दररोज आलेली ही माहिती एकत्रित संकलित करून पॉझिटिव्ह व्यक्ती कोणत्या तालुक्‍यातील आहे, त्या तालुक्‍याच्या आरोग्यधिकारी, तहसीलदार यांना "कोविड वॉर' करून माहिती दिली जाते. ते त्या माहितीच्या आधारे संबंधिताला शोधतात. नंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींना शोधतात. त्यांना लक्षणांनुसार कोविड केअर सेंटर, कोविड रुग्णालयात दाखल केले जाते. त्यावर तातडीचे उपचार करून तो लवकर बरा होण्यासाठी प्रयत्न केले जातात. 


चार लाखांवर नागरिकांकडे ऍप 
जिल्ह्यात मोबाईल टॉवरची संख्या 450 आहे. याद्वारेच संबंधित पॉझिटिव्ह रुग्णाचे ठिकाण, मोबाईल क्रमांक, व्यक्तीचे नाव शोधले जाते. लक्षणावरून "टेस्ट रिकमंडेड', "क्वारंटाइन', "कॉशन' असा सल्ला दिला जातो. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख 24 हजार 724 नागरिकांनी आरोग्यसेतू ऍप डाउनलोड केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT