khadse bjp resigned later
khadse bjp resigned later 
जळगाव

नाथाभाऊंचा राजीनामा स्‍वागत- शुभेच्छा नव्हे; तर या कारणाने होतोय ट्रोल

उमेश काटे

अमळनेर (जळगाव) : माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपा ला जय श्रीराम करत राजकीय क्षेत्रात अपेक्षित भूकंप केला. श्री खडसे यांनी राजीनाम्याचे पत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना दिले आहे. मात्र राजीनाम्याचे पत्र कालपासून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यात अनेकांनी याचे स्वागत केले असले तरी काही नेटकऱ्यानी मात्र दोन ओळींच्या राजीनामा पत्रात असलेल्या "शुद्धलेखनाच्या चुकाबद्दल ट्रोल" केले आहे.

खडसेचे राजीनामा पत्र जर इंग्रजीत असते, तर फक्त स्पेलिंगच्या चुकांसाठी हे प्रचंड गाजले असते. पण मराठीत शुद्धलेखन हे नेहमीच दुर्लक्षित केले जाते. मराठीवर प्रेम करणारे अनेक जण ही लिहिताना अनेक चुका करतात. मात्र दोन ओळीच्या राजीनामा पत्रात किती चुका असाव्यात? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. 

अशा काढल्‍या गेल्‍यात चुका
शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी उडी घेतल्याने याची आज सोशल मीडियावर चर्चा होती. या पत्रात "प्रती" हा शब्द "प्रति" हवा, "वैयक्तीक" शब्द "वैयक्तिक" हवा, "प्राथमीक" शब्द "प्राथमिक" हवा, ऑक्टोबर वर टिंब दिलाय तो नको, वर "महसुल" शब्द "महसूल" हवा, कृषीमंत्री शब्द कसा लिहावा?, विधानसभा हे जोडून हवे. नाथाभाऊंचे हे दोन ओळींचे पत्र हे खूप व्हायरल होणार होते. हे माहीत असताना त्याबाबत इतके दुर्लक्ष का करण्यात आले आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे. कुलकर्णी यांनी केलेल्या पोस्टवर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. खडसे समर्थक अनेक कार्यकर्ते तसेच काही जण "तुम्ही बहुजन लोकांच्या शुद्धलेखन दोष काढणार" हा आशय घेवून श्री. कुलकर्णी यांना ट्रोल करतील याचीही त्यांना जाणीव आहे.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SSLC Exam Result : दहावी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर; 'या' वेबसाइटवर पाहू शकता Result

Sakal Podcast: शिरुर लोकसभेसाठी कुणाचं पारडं राहणार जड? ते सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना

Nagpur Earthquake : नागपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंप; आठवड्याभरात चौथ्यांदा हादरली जमीन; नागरिक भयभीत

Panchang 9 May : आजच्या दिवशी दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT