जळगाव

लॉकडाऊनचा कठीण काळ...आणि घर चालविण्यासाठी अनेकांनी धरली फळ-भाजी विक्रीची वाट 

भूषण श्रीखंडे

जळगाव ः कोरोना महामारीमुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था बिघडली आहे. त्यात चार महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे भारताची अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे लहान व्यवसायीकासह हातावर व्यवसाय करणाऱयांना मोठे आर्थिक संकट आले होते. पंरतू या लॉकडाऊनच्या कठीण काळात जीवनाश्‍य वस्तू विक्रीत भाजीपाला व्यवसायाला सुट असल्याने पारंपारीक व्यवसाय बंद असल्याने फळ-भाजी विक्रीचा व्यवसायाची वाट धरली. आणि तब्बल चार महिन्यात सुमारे ६ हजार नविन भाजी विक्रेते शहरातील गल्लो गल्लीत फिरत होते.

जळगाव शहरात कोरोनाच्या प्रादुर्भाव मोठया प्रमाणात दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरातील परिस्थीती चिंताजणक झाली आहे. त्यात चार महिन्याच्या लॉकडाऊन मुळे शहरातील सर्वच लहान-मोठे व्यवसायकावर परिणाम मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यात हातावर व्यवसायक करणाऱया नागरिकांचा तर खाण्या पिण्याचे वांधे निर्माण झाले होते. परंतू अशा कठिण काळात अनेकांना कुंटूंबाला दोन वेळचे अन्न व घर प्रपंच चालविण्याचा मार्ग हा फळ-भाजी विक्रीच्या व्यवसायातून दिसला आणि. एकमेकांचे बघतात बघता शहरात सुमारे नविन सहा हजार नागरिक या व्यवसायाकडे वळाले.


दारोदारी जावून विकला भाजीपाला
लॉकडाऊन मूळे लहान व्यवसायीक, मोल मजूरी करणाऱयांचे चार महिने काम बंद होते. त्यात रिक्षाचालक, सलुन, चणे फुटाणे, खाद्यपदार्थाच्या हातगाड्या, मजुरीवर पोट भरणाऱयांनी लॉकडाऊन अत्यावश्‍य सेवेत भाजी विक्री करता येत असल्याची संधी साधली. आणि बाजार समितीमधून भाजीपालाचा माल घेवून कोणी डोक्यावर, कोणी सायकलवर, लोटगाडी, प्रवासी रिक्षा, मालवाहतुक रिक्षा घेवून घराच्या बाहेर पडून गल्लो गल्ली भाजी विक्री करू लागले. तर अनेक सदनशील शेतकऱयांनी जळगाव येवून त्यांच्या चारचाकी वाहन, ट्रॅक्टरव फिरून शहरात फळ- भाजीपाला विकला.

फळ- भाज्यांची आता ऑनलाईन ऑडर 
शहरात काही जणांकडून भाजीपाला तसेच फळ घरपोच देण्याचा देखील व्यवसाय सुरू केला. त्यात ऑनलाईन, व्हॉटसअपच्या माध्यमातून ऑडर घेवून थेट नागरिकांना त्यांच्या घरी पोहचविण्याची सोय शहरातील एक- दोन जणांनी आता सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या सुरक्षीत व चांगल्या भाज्या व फळे मिळत आहे.  

अतिक्रमण विभागाची टांगती तलवार
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिम सुरू असून लॉकडाऊन नियम मोडण्याऱयांवर देखील कारवाई केली जात आहे. महापालिकेने शहरात अनेक ठिकाणी भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा तयार केली आहे. परंतू शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन कारवाईत केवळ भाजी विक्रेत्यांना टारगेट केले जात असल्याचे देखील दिसून येत असून इतर अतिक्रमणे करणाऱयांवर कारवाई का केली जात नाही असा सर्वसामान्यांना आता पडू लागला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Student Protest: राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'एमपीएससी'च्या सचिवांची बदली; पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या अडचणीत आणखी वाढ? कार्यकर्त्यांनी महिलांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

गायत्री दातारने सांगितलं कसं आहे सासरचं वातावरण; म्हणते- सासूबाई मला काम करू देत नाहीत कारण...

Latest Marathi News Live Update : बीड, जळगाव जिल्ह्यातील भाजपसह शरद पवार गटातील नेत्यांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक! कुस्तीपटू सुजीत कालकलचे रोमहर्षक सुवर्ण, भारताची पदकतालिकेत मोठी भरारी

SCROLL FOR NEXT